शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा करा कोरा

By admin | Updated: March 26, 2016 00:07 IST

विदर्भातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करा. गारपीटमुळे नुकसानग्रस्त ...

रवी राणा यांची मागणी : केंद्रीय वित्तमंत्र्यांना साकडेअमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करा. गारपीटमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये याप्रमाणे मदत मिळावी, अशी आर्त हाक आ. रवी राणा यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली. अर्धातास चाललेल्या चर्चेत आ.राणा यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.दिल्ली येथे आ. रवी राणा यांनी केंद्रीय वित्तमंत्री जेटली यांची भेट घेऊन अमरावती जिल्ह्यात निर्माण झालेली शेतकऱ्यांची परिस्थिती विशद केली. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना मुलांबाळांचे शिक्षण, लग्नप्रसंग करणे कठीण झाले आहे. बँक कर्ज, सावकारी कर्जाच्या विळख्याने शेतकरी खचला आहे. त्यामुळे सरसट कर्जमाफी देऊन त्याचा जगण्याचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी आ. राणा यांनी केली. नुकत्याच झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मागासवर्गिय, आदिवासी, ओबीसी समाजाचे शेतकरी अधिक आहेत. सततच्या नापिकीने खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी राणा यांनी केली. सुवर्णकार व्यवसायावरील अबकारी कराचा मुद्दा मांडलाकेंद्र शासनाने सोने- चांदी व्यवसायावर एक्साईज ड्युटी आकारल्यामुळे सुवर्णकार व्यवसाय कोलमडला आहे. त्याकरिता देशभरातील सुवर्णकारांनी बंद पुकारला असून विदर्भातील सराफा व्यवसायिकांनी यात समावेश घेतला आहे. महागाई, नापिकी, दुष्काळ अशा पार्श्वभूमिवर सोने, चांदी व्यवसायावर आकारण्यात आलेला आबकारी कर रद्द करण्यासाठी आ. राणा यांनी केंद्रीय वित्तमंत्र्यांना साकडे घातले आहे. (प्रतिनिधी)