परतवाड्यात दोन दिवसात सात पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:01:32+5:30

सिव्हील लाईनमध्ये वास्तव्यास असलेला हा ४६ वर्षीय कपडा व्यापारी आपल्या कुटुंबीयांसमवेत ४ जुलै रोजी कारने अमळनेरला गेला होता. तेथून ५ जुलै रोजी ते शहरात परत आले. दरम्यान प्रकृती ठिक वाटत नसल्यामुळे त्या पती-पत्नीने १० जुलै रोजी अमरावतीला जाऊन थ्रोट स्वॅब तपासणीला दिलेत. यात त्या व्यापाऱ्याचा ११ जुलैला सायंकाळी, तर त्याच्या पत्नीचा थ्रोट स्वॅब अहवाल १२ जुलैला पॉझिटिव्ह आला.

Seven positives in two days in return | परतवाड्यात दोन दिवसात सात पॉझिटिव्ह

परतवाड्यात दोन दिवसात सात पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देकपडा व्यापाऱ्यासह पत्नीही बाधित : नगराध्यक्षांनी घेतली तातडीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरात दोन दिवसांत सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात शनिवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कपडा व्यापाऱ्यांच्या पत्नीचाही थ्रोट स्वॅब अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे.
सिव्हील लाईनमध्ये वास्तव्यास असलेला हा ४६ वर्षीय कपडा व्यापारी आपल्या कुटुंबीयांसमवेत ४ जुलै रोजी कारने अमळनेरला गेला होता. तेथून ५ जुलै रोजी ते शहरात परत आले. दरम्यान प्रकृती ठिक वाटत नसल्यामुळे त्या पती-पत्नीने १० जुलै रोजी अमरावतीला जाऊन थ्रोट स्वॅब तपासणीला दिलेत. यात त्या व्यापाऱ्याचा ११ जुलैला सायंकाळी, तर त्याच्या पत्नीचा थ्रोट स्वॅब अहवाल १२ जुलैला पॉझिटिव्ह आला. अमळनेरला जाण्याकरिता या व्यापाऱ्याने प्रशासनाकडून परवानगी घेतलेली नव्हती.
कपडा व्यापारी आणि त्याच्या पत्नीला अमरावती येथील कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर त्याच्या कुटुंबातील सहा जणांसह त्या वाहनावरील चालकासह त्याच्या कुटुंबातील चौघांना अग्रसेन भवनमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. या व्यापाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे. दरम्यान १२ जुलै रोजी परतवाड्यातील हबीबनगरमधील ३८ वर्षीय पुरुषाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला अमरावतीला हलविण्यात आले असून, त्याच्या पत्नीला अग्रसेन भवन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच कल्याण मंडपममध्ये क्वारंटाईन असलेल्या चौघांचा थ्रोट स्वॅब अहवाल शनिवार १५ जुलैला पॉझिटिव्ह आल्यामुळे परतवाडा शहरात अवघ्या दोन दिवसांत सात रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगराध्यक्षांकडून आढावा
दोन दिवसांतील वाढती रुग्णसंख्या बघून अचलपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सुनीता फिसके यांनी रविवारी अधिकाऱ्यांसमवेत तातडीची सभा घेतली. यात त्यांनी पालिका प्रशासनाकडून परिस्थितीसह उपाययोजनांची माहिती घेतली. अग्रसेन भवनमधील क्वारंटाईन सेंटरलाही त्यांनी भेट दिली.

दोन दिवसात परतवाड्यात सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आलेत. त्या कपडा व्यापाऱ्यासह त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सद्या शहरात २३ लोक संस्थात्मक तर २ हजार ३०० लोक होम क्वारंटाईन आहेत.
- रोहन राठोड
कर निरिक्षक, अचलपूर पालिका

Web Title: Seven positives in two days in return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.