शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचा वरचष्मा, काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन जागा

By admin | Updated: September 14, 2014 23:45 IST

जिल्ह्यातील चौदा पंचायत समित्यांपैकी दहा पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी आज रविवारी निवडणूक पार पडली. यात शिवसेनेने तीन पंचायत समितींवर भगवा फडकविला. काँगे्रस,

पं.स. सभापती-उपसभापती निवडणूक : भाजपची पीछाडी, रिपाइं, बसप, प्रहारला संधी अमरावती : जिल्ह्यातील चौदा पंचायत समित्यांपैकी दहा पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी आज रविवारी निवडणूक पार पडली. यात शिवसेनेने तीन पंचायत समितींवर भगवा फडकविला. काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी दोन सभापतीपद मिळाले. यात रिपाइं, बसप व प्रहारलाही संधी मिळाली. परंतु सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप माघारली.अमरावती पंचायती समिती सभापतीपदी शिवसेनेचे आशिष धर्माळे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे भाष्कर गभणे अविरोध विजयी झाले. येथे शिवसेना व राष्ट्रवादीने युती करुन निवडणूक अविरोध घडवून आणली. अंजनगाव-सुर्जी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे विनोद टेकाडे व उपसभापतीपदी भाजप समर्थित नितीन पटेल विजयी झाले. आठ सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या समर्थनाने शिवसेनला सत्ता काबीज करण्यात यश मिळाले.भातकुली पंचायत समितीत शिवसेनेच्या सुनीता वानखडे या सभापती तर उपसभापतीपदी युवा स्वाभिमान संघटनेच्या संगीता चुणकीकर विजयी झाल्यात. भातकुलीत शिवसेना, राष्ट्रवादी व युवा स्वाभीमान संघटनेने युती केली होती. नांदगाव (खंडेश्वर)मध्ये बसपच्या शोभा इंगोले सभापतीपदी तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या रेखा नागोलकर विजयी झाल्या. येथे बसप व शिवसेनेने हातमिळवणी करुन सत्ता काबिज केली.अचलपूर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सोनाली देशमुख तर उपसभापतीपदी प्रहारचे गजानन मोरे विजयी झाले. येथे काँग्रेस-प्रहारची युती होती. मोर्शी पंचायत समितीमध्ये सभापतीपदी राष्ट्रवादीच्या पद्मा पंचाळे यांची अविरोध तर उपसभापतीपदी अपक्ष रेखा संजय सोनटक्के विजयी झाल्या. सोनटक्के यांनी राष्ट्रवादीचे अनिल अमृते यांचा पराभव केला.दर्यापूर पंचायत समिती सभापतीपदी रिपाइंच्या रेखा वाकपांजर तर शिवसेनेचे संजय देशमुख उपसभापती अविरोध विजयी झाले. शिवसेना, रिपाइं, राष्ट्रवादीच्या युतीने ही सत्ता मिळविली.चिखलदरा येथे काँग्रेस पक्षाने भाजप उमेदवारांचा पराभव करुन दोन्ही जागा मिळविल्या. सभापतीपदी काँग्रेसचे दयाराम काळे तर उपसभापतीपदी भागिरथी चिमोटे विजयी झाल्या. चांदूरबाजारमध्ये प्रहारने सभापती-उपसभापतीपदावर निर्विवाद वर्चस्व मिळविले. बारा सदस्य संख्या असलेल्या चांदूरबाजार पंचायत समितीमध्ये प्रहारची सदस्य संख्या सहा आहे. सत्ता स्थापनेसाठी सातचे संख्याबळ आवश्यक असताना काँग्रेसचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने प्रहारच्या अर्चना अवसरमोल सभापतीपदी तर उपसभापतीपदी राजेश सोलव विजयी झाले. वरुड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा झेंडा रोवला. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नीता सुरेंद्र जिचकार तर उपसभापतीपदी मोहन अलोणे आरुढ झाले. त्यांनी काँग्रेस-विदर्भ जनसंग्राम युतीच्या उमेदवाराचा पराभव केला.