शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५१,२७३ रेशन दुकानांमधून दूधविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 11:47 IST

राज्यातील ५१ हजार २७३ रास्त भाव दुकानांमधून दूधविक्री केली जाणार आहे. रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२.५६ कोटी शिधापत्रिकाधारकदुकानदारांच्या हितार्थ निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्यातील ५१ हजार २७३ रास्त भाव दुकानांमधून दूधविक्री केली जाणार आहे. रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय दूध योजनेत उत्पादित होणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच आरे ब्रँडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.यापूर्वी १९ जानेवारी व ९ मार्च २०१८ रोजीच्या निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित अर्थात महानंद या दुग्धशाळेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ रास्त भाव दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आरे आणि शासकीय दूध योजनेतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाचे वितरण तथा विक्री करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव कृषी व पदूम विकास विभागाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला दिला होता. त्याअनुषंगाने ५ एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हणून रास्तभाव दुकानाची निवडराज्यात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ५१२७३ रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी ५४२७ आदिवासी भागात व २८ फिरती दुकाने आहेत. या दुकानांशी तब्बल २.५६ कोटी शिधापत्रिकाधारक जोडले गेले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना जोडणारी ही सर्वाधिक व्यापक योजना आहे. गावखेड्यात रास्त भाव दुकाने असल्याने आणि दूध ही दैनंदिन गरजेची वस्तू असल्याने दुधाची मोठी विक्री होऊ शकते. त्यातून रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढण्याची मोठी शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :milkदूध