शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंअर्थसहाय्यित शाळा हा शिक्षकांविरूद्धचा कटच

By admin | Updated: June 14, 2014 23:01 IST

राज्यभरात सध्या स्वयं अर्थसहाय्यित शाळांची खैरात वाटली जात आहे. स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे उद्योजकांना शाळांचे व्यापारीकरण करण्याची मुभा देणे. हा शिक्षकांविरूध्द रचलेला कट आहे.

शेखर भोयर यांचा आरोप : प्रचाराला आला वेग
अमरावती : राज्यभरात सध्या स्वयं अर्थसहाय्यित शाळांची खैरात वाटली जात आहे. स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे उद्योजकांना शाळांचे व्यापारीकरण करण्याची मुभा देणे. हा शिक्षकांविरूध्द रचलेला कट आहे. शिक्षण क्षेत्रासाठी ही अतिशय दुर्देवी बाब असल्याचे मत डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद व जनसंग्राम शिक्षक संघटनेचे उमेदवार शेखर भोयर यांनी व्यक्त केले.
सध्या शिक्षक प्रशासनाच्या विविध निकषांच्या पूर्ततेमध्ये पूरता अडकून गेला आहे. त्यातच शिक्षणाचा अधिकार अधिनियम या कायद्याने त्याची पूरती गोची झाली आहे. या स्थितीत स्वयंअर्थसहाय्यित शाळा म्हणजे शिक्षकांवर अन्याय करणारा प्रकार आहे. यामुळे जमीन आणि भरमसाठ पैसा असणाऱ्याला शाळा काढण्याची परवानगी देणे असाच याचा अर्थ होतो. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या आक्रमणात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ओस पडत चालल्या आहेत.
हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. स्वयं अर्थसहाय्यित शाळा गावागावात सुरू झाल्यास शासकीय शाळा ओस पडतील आणि हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील, असे सांगून हा कुटील डाव हाणून पाडण्याचा विडा उचलल्याचे यावेळी भोयर यांनी सांगितले.
स्वयं अर्थसहाय्यित शाळांचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नसून या शाळांची पटसंख्या टिकवण्यासाठी सरकारी शााळांमधूनच विद्यार्थी पळविले जातील, अशी शंकासुध्दा शेखर भोयर यांनी व्यक्त केली. यामुळे शासकीय शाळांमधील विद्यार्थी संख्या घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार रोखण्याकरिता आवश्यक ते प्रयत्न करण्याचा विश्वास यावेळी भोयर यांनी शिक्षकांना दिला.