शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांचा शाळा, कॉलेजला ‘नो रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 23:21 IST

शालेय अभ्यासक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमावलींचे पालन करून शिकवणीचे नियोजन केले आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य भीती लक्षात घेता ९८ टक्के पालकांनी लस नाही, तर शाळा नाही असा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनानंतरही पालकांनी शाळांना नकारघंटा कायम आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी झाली, मुलांचे काय, असा सवाल बहुतांश पालकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती, १० हजारांचा पल्ला गाठला नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या. मात्र पाच दिवसांनंतरही १० हजारांच्या पुढे विद्यार्थी शाळेत उपस्थिती दर्शवू शकले नाही. अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, नगरपंचायतींच्या एकूण ५४८ शाळांमध्ये १.५५ लाख विद्यार्थी संख्या असल्याची नोंद शिक्षण विभागात आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळांना पालकांचा ‘नो रिस्पॉन्स’ हे वास्तव आहे.शालेय अभ्यासक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमावलींचे पालन करून शिकवणीचे नियोजन केले आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य भीती लक्षात घेता ९८ टक्के पालकांनी लस नाही, तर शाळा नाही असा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनानंतरही पालकांनी शाळांना नकारघंटा कायम आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी झाली, मुलांचे काय, असा सवाल बहुतांश पालकांनी उपस्थित केला आहे. जीवापेक्षा शिक्षण मोठे नाही, अशा अनेक पालकांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या आहेत. मुलांना कोरोनाची लागण झाल्यास कुटुंबीयांच्या आराेग्याची काळजी कोण घेणार, असा सूर पालकांमधून उमटत आहे. लस आल्याशिवाय मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय वीरेंद्र गलफट या पालकाने घेतला आहे. हीच स्थिती शहरासह ग्रामीण भागातील पालकांची आहे. त्यामुळे जिल्हाभरात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस शाळा सुरू होऊनही विद्यार्थी संख्येने १० हजारांचा आकडा पार केलेला नाही, असे उपस्थितीहून दिसून येते. नववी ते बारावीपर्यत महापालिकेच्या माध्यमिक सहा शाळा असून, एकूण ४५० विद्यार्थ्यांपैकी दरदिवशी १४० ते १५० विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती महापालिका शिक्षणाधिकारी अब्दूल राजीक यांनी दिली.  

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या