शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एक हजारांवर गावांमध्ये शाळेची घंटा वाजणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त गावांतील ...

अमरावती : कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १६८७ गावांपैकी १५३६ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे अशा गावातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या गावांमध्ये लवकर शाळेची घंटा वाजण्याची शक्यता आहे. शासनाचा हा निर्णयास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, तर साधारणपणे एक हजारांवर गावांमधील शाळांची घंटा वाजू शकते. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक-मानसिक दुष्परिणाम होत आहेत, शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता, यासाठी शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित क्षेत्रातील ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शाळेचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावण्यात यावे, वर्ग अदलाबदलीच्या दिवशी सकाळी, दुपारी ठरावीक विषयासाठी प्राधान्य द्यावे तसेच सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. एका बेंचवर एकच विद्यार्थी, दोन बेंचमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर,कोणती लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवून लगेच काेरोना चाचणी करून घेणे, संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्‍याबाबत दक्षता घ्यावी, शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन यासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बॉक्स

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावांची संख्या

अमरावती १२९, भातकुली १२३, मोर्शी १०१, वरूड १०६, अंजगाव सुर्जी ८५, अचलपूर ९४, चांदूर रेल्वे ७९, चांदूर बाजार १२७, चिखलदरा १६५, धारणी १५३, दर्यापूर १०५,धामणगाव रेल्वे ८२, तिवसा ६६, नांदगाव खंडेश्वर १२१ याप्रमाणे कोरोनामुक्त गावांची संख्या आहे.

कोट

शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. मात्र, याकरिता संबंधित ग्रामपंचायतींचा ठराव, पालकांची समंती आवश्यक आहे. वर्ग सुरू करण्याबाबत वरिष्ठांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई केली जाईल.

- अनिल कोल्हे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)