शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दररोज वाचवा १० लाख युनिट वीज

By admin | Updated: October 29, 2014 22:43 IST

येत्या काळात विजेची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील नागरिक दरदिवशी रात्री तासभर काळोख ठेवून मेणबत्ती लावतात. हाच प्रयोग अमरावती महानगरात झाला तर दरदिवसाला १० लाख

अमरावती : येत्या काळात विजेची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील नागरिक दरदिवशी रात्री तासभर काळोख ठेवून मेणबत्ती लावतात. हाच प्रयोग अमरावती महानगरात झाला तर दरदिवसाला १० लाख युनिट इतकी वीज बचत होईल, असा दावा वीज वितरण कंपनीने केला आहे.वीज उत्पादनापेक्षा वापर अधिक प्रमाणात होत असल्यामुळे विजेची समस्या गंभीर वळण घेणार आहे. त्यामुळे प्रत्येकानेच वीज वापरात काटकसर करणे आवश्यक झाले आहे. हल्ली अमरावती, बडनेरा शहरात दरदिवसाला १० हजार कोटी युनिट विद्युतचा वापर होत असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड यांनी दिली. वीज चोरी रोखण्यासाठी देखील उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनीच करावे बचतीचे नियोजन आजच्या परिस्थितीत वीज ही अत्यावश्यक बाब असली तरी वीजेचा वापर कसा कमी करता येईल, याचे नियोजन स्वत: नागरिकांनाच करावे लागणार आहे. घरात अनावश्यक यंत्रे बंद करावेत, दिवे, पंखे, एसी, कुकींगचे साहित्य कमी वापरावे तसेच कमी क्षमतेचे दिवे वापरल्यास विद्युत कमी लागेल. घरी एलईडी, सीएफएलचे दिवे वापरल्यास वीज कमी लागून देयकातही बराच दिलासा मिळेल, असे मोहोड यांनी सांगितले. वीज वापर करणे हे नागरिकांच्या हाती असून भविष्यात वीजेची समस्या गंभीर होऊ नये, यासाठी दरदिवसाला तासभर काळोख ठेवून वीज बचतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे मोहोड यांनी सांगितले. अनावश्यक विजेचा वापर टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला तर भविष्यात विजेचे संकट ओढावणार नाही, असे विज वितरण कंपनीचे म्हणने आहे.