सरपंच, सचिवाने गुपचूप काढल्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:02+5:302021-09-02T04:28:02+5:30

फोटो - भगोले ३१ पी चांदूर रेल्वे : तालुक्यातील जळका जगताप ग्रामपंचायतीत पंधरावा वित्त आयोग व इतर योजनांतून करावयाच्या ...

Sarpanch, Secretary secretly issued tenders | सरपंच, सचिवाने गुपचूप काढल्या निविदा

सरपंच, सचिवाने गुपचूप काढल्या निविदा

फोटो - भगोले ३१ पी

चांदूर रेल्वे : तालुक्यातील जळका जगताप ग्रामपंचायतीत पंधरावा वित्त आयोग व इतर योजनांतून करावयाच्या कामांच्या निविदा सरपंच, सचिवांनी प्रक्रिया अव्हेरून प्रसिद्ध केल्याचा आरोप पाच सदस्यांनी केला आहे. या निविदा रद्द करण्यात याव्या, अशी मागणी जळका जगताप येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली.

निवेदनानुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका जगताप येथील सरपंच व ग्रामसचिव यांनी पंधरावा वित्त आयोग व इतर योजनांच्या कामांची प्रसिद्धी १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान एका साप्ताहिकाला दिली होती. ही संपूर्ण निविदा करून फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात यावी व सरपंच, सचिव यांच्यावर कारवाई करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रमेश ठाकरे, गजानन भरडे, प्रशांत पोपटकर, सारिका मांडूळकर, कल्पना ढोणे यांनी निवेदनाद्वारे खंडविकास अधिकारी यांच्याकडे केली. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले नाही तसेच यासंबंधी ठरावसुद्धा घेतले नसल्याचा आक्षेप निवेदनात नोंदविला आहे.

--------------

निविदा संदर्भात ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पत्र दिले होते. पंचायत समितीकडून निवीदा प्रसिद्ध करण्याकरिता वृत्तपत्राचे नाव दिले गेले. याशिवाय निविदाची एक प्रत ग्रामपंचायत फलकावरसुद्धा लावले होते. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच हे काम केले आहे. तक्रार राजकीय हेतूने प्रेरित आहे.

- भाग्यश्री खेरडे, सरपंच, जळका

---------------

वृत्तपत्रात १८ ऑगस्टला निविदा प्रसिद्ध झाली व यानंतर दरपत्रक बोलाविण्यात आले. सीलबंद तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसारच झाली आहे. कामासाठी कोणतेही कंत्राटदाराला असो, ते माझ्यासाठी सारखेच आहेत.

- गजानन काळमेघ, ग्रामसचिव, जळका

-----------

जळका जगताप येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांची निविदासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. निवेदनावर पाच ग्रामपंचायत सदस्यांची सही आहे. विस्तार अधिकारी (पंचायत) उमक यांच्याकडे चौकशी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून लेखी अहवाल मागविला आहे.

- सुरेश थोरात, खंडविकास अधिकारी

310821\img-20210831-wa0007.jpg

photo

Web Title: Sarpanch, Secretary secretly issued tenders