शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
6
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
7
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
8
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
9
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
10
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
11
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
12
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
13
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
14
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
15
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
16
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
19
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
20
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
Daily Top 2Weekly Top 5

नियम गॅसवर!

By admin | Updated: June 14, 2014 23:00 IST

शहर पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये दररोज सहभागी होणाऱ्या हजारोे उमेदवारांसाठी परिसरात पाणी तसेच चहा-नाश्त्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत.परंतु या स्टॉल्समध्ये अन्नपदार्थ

पोलीस भरती : अंमलदारांदेखत कायद्याची ऐशीतैशी
प्रसन्न दुचक्के - अमरावती
शहर पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये दररोज सहभागी होणाऱ्या हजारोे उमेदवारांसाठी परिसरात पाणी तसेच चहा-नाश्त्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत.परंतु या स्टॉल्समध्ये अन्नपदार्थ शिजविण्यासाठी सर्रास नियम धाब्यावर बसवून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हा प्रकार उघड आला.
शहर पोलीस भरती प्रक्रिया ६ जूनपासून सुरू झाली. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडूून आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या. याच अनुषंगाने येथे खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले; मात्र तेथे चक्क घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होतोय.
अपघात घडल्यास जबाबदार कोण ?
पोलीस मुख्यालय व विद्यापीठाच्या प्रांगणात ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे तेथे पाणी व चहा-नाश्त्याचे हॉटेल लावण्यात आले आहे. यातील पोलिसांचा परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या पोलीस मुख्यालयासमोरील प्रांगणात चहा-नाश्त्याचे हॉटेल लावण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती हा कॅटरर्सचा व्यवसाय करतो.
पोलीस भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत त्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुख्यालयासमोरील फुटबॉल मैदानासमोर हॉटेल थाटले आहे. हे हॉटेल सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असते. या कालावधीत हॉटेलवर गरमागरम भजी व नाश्ता घेण्यासाठी शेकडो उमेदवारांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची गर्दी उसळते. परंतु पोलिसांच्या देखतच सार्वजनिक ठिकाणी या हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे.
खुलेआम सुरू असणाऱ्या या सिलिंडर व गॅस शेगडीकडे अनेकांचे लक्ष जाते. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांचे या नियमबाह्य प्रकाराकडे दुर्लक्ष आहे.
कुठल्याही ठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर कमर्शिअल सिलिंडरचाच वापर करावा, असा शासन नियम असतानाही हे हॉटेल व्यावसायिक चक्क नियम धाब्यावर बसवून समोरच व्यवसाय थाटत आहे. थेट घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. संबंधित हॉटेल व्यावसायिक घरगुती सिलिंडरचा वापर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरच खुल्या जागेत करीत असल्याने तेथील परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. यावर प्रकरणी पोलीस आयुक्त आपली काय भूमिका बजावितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)