शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

रुंदसरी, वरंबा पद्धतीची पेरणी आवश्यक

By admin | Updated: June 28, 2015 00:35 IST

कोरडवाहू क्षेत्रासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. नैर्ऋत्त्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनिश्चित आहे.

कमी पावसाच्या उपाययोजना : पावसाचे पाणी जिरविणे गरजेचेअमरावती : कोरडवाहू क्षेत्रासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. नैर्ऋत्त्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनिश्चित आहे. ढोबळ मानाने चार महिने पाऊस पडतो. यामधील एक महिना जरी कोरडा गेला तरी उर्वरित पाऊस पिकाला पुरेसा राहील, असे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी पेरणीला रुंदसरी व वरंबा पद्धती वापरणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिके घेतली जातात. यामध्ये ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे, तर १५ टक्के क्षेत्रात संरक्षित सिंचनाची सोय आहे. जिल्ह्यात शेतकरी प्रामुख्याने उपलब्ध असलेल्या यंत्र सामग्रीचा वापर करुन पारंपरिक पध्दतीने शेती करतात. यामध्ये बियाण्यांचे असमान वाटप, जास्तीचे बियाणे, दोन रोपांमधील असमान अंतर, कुशल मजुरांची कमतरता, दिवसेंदिवस वाढणारी मजुरी, पेरणीसाठी लागणारा वेळ, यासारख्या अनेक समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. यासाठी कृषी विद्यापीठ अकोला यांनी ट्रॅक्टरचलित रुंदसरी वरंबा टोकन यंत्र विकसित करुन कृषी औद्योगिक विकास महामंडळाव्दारे समोर आणले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपयोग होणार आहे. (प्रतिनिधी)काय आहे बीबीएफ यंत्र ?डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाव्दारे बीबीएफ (ब्रॉड बेड फरोज) किंवा रुंद वरंबा सरी टोकण आणि आंतरमशागत यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या माध्यमातून रुंद वरंबा सरी पाडून त्यावर पेरणी, खत देणे शक्य होते. दोन सऱ्यांमध्ये रुंद वरंबा तयार होऊन टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी होते. पिकांना दोन ओळ आणि दोन रोपांमधील अंतरानुसार पेरणी करणे शक्य होते. या पेरणीमुळे हवा आणि जमिनीतील ओलावा यांचे संतुलन राहून वरंब्यामध्ये ओलावा टिकून राहतो. जिरलेल्या पाण्यावर पिके तग धरु शकतातबीबीएफ तंत्रज्ञानामुळे पावसाच्या काळात सरीमध्ये जमा झालेले पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण तयार झाल्याने वापसाची स्थिती निर्माण होते. पिकांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. या पाण्याच्या भरवशावर पिके १० ते १२ दिवस तग धरु शकतात. पाऊ स जास्त झाल्यास सरीव्दारे पाणी निघून जाते. पिकाच्या मुळासी पाणी साचून राहत नसल्याने नुकसान होत नाही.कोरडवाहू पिकांसाठी बीबीएफ वरदायीआंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्युट) ही संस्था जगातील अविकसित देशात कार्यरत आहे. या संस्थेव्दारे प्रथम बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला व हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. पावसाची अनिश्चितता असल्याने पीक जगविणे व उत्पादकता वाढविणे हा या तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. राळेगणसिध्दी येथे अन्ना हजारे व हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करून समृध्दी निर्माण केली आहे. कोरडवाहू शेतीसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. पिकांच्या वाढीचा काळ असताना नेमका आपल्या भागात खंड पडतो. यावेळी सरी, वरंबा पध्दत, बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरते. - केशवराव ठाकरे,कृषिशास्त्रज्ञ (निवृत्त)