वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:11 IST2021-04-18T04:11:43+5:302021-04-18T04:11:43+5:30

वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्ग वर्दळीचा असून, या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ...

The road from Vathoda Shukleshwar to Mahispur is rocky | वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्ग खड्डेमय

वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्ग खड्डेमय

वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्ग वर्दळीचा असून, या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

वाठोडा ते म्हैसपूर या मार्गावर सोनारखेडा, भालसी, ढंगारखेडा, वाकी ग्रामस्थांची ये-जा असते. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, गत एका वर्षात या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडले. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त करीत प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र, दखल घेण्यात आली नाही.

Web Title: The road from Vathoda Shukleshwar to Mahispur is rocky