शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महसूल, बांधकामाच्या वादात रखडले पांदण रस्ते

By admin | Updated: September 30, 2015 00:36 IST

शेतातील पांदण रस्ते मोकळे करण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र चांदूरबाजार-शिरजगाव बंड हा पांदण ...

१० वर्षांत केले केवळ मातीकाम : सहा वर्षांपासून खडीकरणासाठी मजूर मिळालेच नाहीचांदूरबाजार : शेतातील पांदण रस्ते मोकळे करण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र चांदूरबाजार-शिरजगाव बंड हा पांदण रस्ता १० वर्षांपासून मोकळा असतानाही केवळ मातीकाम तेवढे करण्यात आले. यासाठी दीड लाख रूपये खर्च करण्यात आला. मात्र खडीकरणाचे काम महसूल व बांधकाम विभागाच्या वादात रखडले. यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी व महसूल विभागाकडे निवेदने दिलीत. मात्र हे काम रोहयो अंतर्गत असल्यामुळे व त्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे रखडल्याचे दोन्ही विभागाकडून सांगण्यात येते. आता बांधकाम विभागानेही सदर कामाकरिता ग्रामपंचायत मजूर उपलब्ध करून देत नसल्यामुळे बांधकाम विभागाकडून हे काम काढून घ्यावे, असे लेखी प्रस्ताव सहायक अभियंत्यांनी तहसील प्रशासन व तक्रारकर्ता संजय इंगोले यांना दिले आहे. सहा वर्षांत या ७०० मीटर रस्त्याचे ७०० मीटर मातीकाम व २०० मीटरचे मुरूम अस्तरीकरणाचे काम बांधकाम विभागाच्या चांदूरबाजार उपविभागामार्फत करण्यात आले. २८ फेब्रुवारी २०१२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदारांना दिलेल्या पत्रानुसार या पाणंद रस्त्याच्या कामाला ५ लाख ८३ हजार ५०० रूपये खर्चाची मान्यता मिळाली. त्यात ४ लाख २८ हजार ५१ रूपये अकुशल तर १ लाख ३१ हजार ५१ रूपये कुशल बाबीवर खर्च करण्याची तरतूद होती. त्यानुसार या रस्त्याच्या मातीकामाला ४ मे २००९ रोजी सुरुवात होऊन १८ जून २००९ पर्यंत मातीकाम पूर्ण झाले. त्यावर १ लाख ५२ हजार २९१ रूपये एवढा खर्च दाखविण्यात आला. मातीकाम पूर्ण झाल्यामुळे काम बंद करण्यात आले आणि खडीकरणाचे काम सामाजिक बांधकाम विभागाकडून करण्यात येऊ शकत नाही, असे लेखी पत्र बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता यांनी तहसीलदारांना दिले.त्यावर तत्कालीन तहसीलदारांनी बांधकाम विभागाच्या अचलपूर येथील कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या ३ मार्च २०१२ च्या पत्रानुसार या पांदण रस्त्याच्या खडीकरणासंदर्भात प्राप्त अहवालानुसार खडीकरणासाठी ९ लाख ८३ हजार ५०० रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. मातीकामावर १ लाख ५२ हजार २९१ रूपये खर्च खडीकरणावर खर्च करण्याला मंजुरी देण्याची विनंती करणारे पत्र तहसीलदारांनी बांधकाम विभागाला दिले होते. (तालुका प्रतिनिधी)