शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' बनावट रेतीला महसूल विभागाचे अभय!

By admin | Updated: June 26, 2016 00:08 IST

येथे शासकीय भूखंडावर कारखान्यातील टाकाऊ दगड, विटांचा चुरा व नाल्यातील रेती मिसळून बनविण्यात येणाऱ्या बनावट कन्हान रेतीचा भंडाफोड लोकमतने शनिवारच्या अंकात केला.

कारवाईत दिरंगाई : आजवर कारवाईसाठी टाळाटाळ श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरायेथे शासकीय भूखंडावर कारखान्यातील टाकाऊ दगड, विटांचा चुरा व नाल्यातील रेती मिसळून बनविण्यात येणाऱ्या बनावट कन्हान रेतीचा भंडाफोड लोकमतने शनिवारच्या अंकात केला. या वृत्ताचे शहरवासियांंनी स्वागत केले. मात्र सुटीचे कारण दर्शवून महसूल कारवार्ई करण्यास दिरंगाई करीत असल्याने हा विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महामार्गालगतच्या सेंट्रल नाक्याजवळ असणाऱ्या शासकीय भूखंडावर बनावट कन्हान रेती तयार करण्याचा धक्कादायक व्यवसाय होत आहे. कन्हानच्या नावे बनावट असणारी ही रेती ज्या कुण्या ग्राहकाने घेतली त्याने या वृत्तानंतर रोष व्यक्त केला. या गोरखधंद्यात मालक कधीच समोर आला नाही. येथील साहित्याची देखरेख व विक्रीची आॅर्डर रखवालदारच घेत आहे. हा सर्व व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. 'लोकमत'च्या वृत्तानंतर हा रखवालदार येथून पसार झाला. दलालांनी ही बनावट रेती विविध ठिकाणी विकली आहे. खासकरवून शासकीय कामांवर खासगी संस्थांना दिल्याची चर्चा आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या या गोरखधंद्यातील सहभागांवर कारवाई करावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.महसूल विभागाने या बाबीकडे गंभीरतेने पहावे.रेतीच्या गोरखधंद्याचा म्होरक्या कोण ? कारखान्यातील टाकावू दगड, विटांचा चुरा व नाल्याची रेती एकत्र करुन कन्हानच्या नावे रेती विकणारा म्होरक्या कोण? ही चर्चा 'लोकमत'च्या वृत्तानंतर समोर आली. या गोरखधंद्यात दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. कन्हानची रेती कमी भावात देऊ, अशी बनावणी करणाऱ्या दलालांनी यात नागरिकांना धोका दिला आहे.आजवर ठोस कारवाई का नाही? महसूल विभागाने ज्या भूखंडावर अवैध रेती विकली जात होती तेथे कारवाई केल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या शासकीय भूखंडावर एकाच ठिकाणी कारखान्यातील वेस्ट दगड विटांचा चुरा व नाल्याची रेती दिसून पडते येथे बनावट रेती तर तयार होत नाही, असा प्रश्न महसूल विभागाला का पडला नाही. हा गोरखधंदा कुणाच्याही लक्षात येऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणतात.