शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओंवर चिठ्ठ्या पोहोचविण्याची जबाबदारी

By admin | Updated: September 30, 2014 23:30 IST

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांचे नाव, त्यांचा यादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती दर्शविणाऱ्या चिठ्ठया मतदान केंद्रावरील बुथ लेव्हल आॅफिसर (बीएलओ)

मतदारांचा वेळ वाचणार : मतदानाची टक्केवारी वाढणार मोर्शी : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांचे नाव, त्यांचा यादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती दर्शविणाऱ्या चिठ्ठया मतदान केंद्रावरील बुथ लेव्हल आॅफिसर (बीएलओ) च्या माध्यमातून मतदारांना घरपोच पोहोचविल्या जाणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हा उपक्रम गत लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने सुरु केला. पूर्वी निवडणुकीतील उमेदवारांतर्फे त्यांचे नाव, निवडणूक चिन्ह आणि त्यालाच मतदान करण्याचे आवाहन असलेल्या चिठ्ठीवर मतदाराचे नाव, मतदार क्रमांक, मतदान केंद्र लिहून चिठ्ठी मतदाराच्या घरी पोहोचविली जात होती. परंंतु काही मतदारांच्या घरी चिठ्ठीच पोहोचत नसे. त्यामुळे असे मतदार आपले नाव मतदार यादीत नसल्याचा समज करुन मतदानासाठी जात नसत किंवा गेले तर त्यांचा बराच वेळ मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधण्यात जात होता. मतदानाची टक्केवारी कमी होण्यात ही बाबसुध्दा महत्त्वाची असल्याची जाणीव निवडणूक आयोगाला झाल्यामुळे गत लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगोतर्फे मतदाराचे नाव, मतदार क्रमांक व केंद्राची माहिती असलेल्या चिठ्ठ्या मतदारांना घरपोच देण्याची योजना बीएलओंच्या माध्यमातून हाती घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाच्या या उपक्रमाची माहिती बऱ्याच सुशिक्षित मतदारांनासुध्दा नव्हती. त्यामुळे चिठ्ठ्या वाटप करणाऱ्या अनेक बीएलओंना मतदारांचा वाईट अनुभव आला. मतदारांच्या घरी चिठ्ठी घेऊन आलेला बीएलओ हा कोणत्या तरी राजकीय पक्ष आणि उमेदवाराचा प्रतिनिधी असल्याच्या समजातून या बीएलओंची खरडपट्टी काढण्यात आल्याचे अनुभव बीएलओंनी विशद केले होते. विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या घरी चिठ्ठ्या पोहोचविण्याची जबाबदारी पुन्हा बीएलओंना देण्यात आली आहे. या फोटो व्होटर स्लिपवर मागील बाजूने शिक्का अंकित केलेला असेल. त्यामुळे फोटो व्होटर स्लिपचे अनधिकृत वितरण, ताबा घेण्याचा प्रकार केल्यास तो गुन्हा ठरेल आणि दंड व कारावासाची शिक्षा होईल. शिवाय मतदान केंद्रात कोणत्याही प्रकारचा कॅमेरा, व्हीडीओ, डिजीटल किंवा मोबाईल नेण्यास प्रतिबंध राहील.अनुपस्थित, स्थलांतरित अशा यादीतील मतदारांनी ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेली कोणतीही कागदपत्रे मतदानाच्या दिवशी अतिरिक्त पुरावा म्हणून आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बुथ लेव्हल आॅफीसर यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून प्रत्यक्ष मतदानाच्या १० दिवस अगोदर अशा चिठ्ठ्या वितरणा करिता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत १०० टक्के चिठ्ठ्यांचे वितरण होईल, असे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)