शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यातील एकझिरावासी पितात दूषित पाणी! मध्यरात्री तीनपासून सुरू होतो पाण्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 15:21 IST

Amravati News water चिखलदरा तालुक्यातील एकझिरा या गावाला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देकायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: चिखलदरा तालुक्यातील एकझिरा या गावाला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलमधून अगदी नसल्यासारखेच व गावालगतच्या विहिरीवरून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चिखलदरा तालुक्यातील एकझिरा हे ७६५ लोकवस्तीचे गाव आहे. येथे जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई जाणवालयला लागते. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. येथील पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च दरवर्षी खर्च केला जातो. परंतू शासनाने येथे अद्यापही कायमस्वरुपी उपाययोजना केलेली नाही. गावाजवळ नाल्यात विहीर आहे. त्या विहिरीतील पाण्यात कधीच ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही. ग्रामसचिव नेहमी गैरहजर असतात. २०० फूट खोल बोअरवेल आहे. हॅन्डपंप आहे. पण पाण्याचा थेंब नाही. ग्रामस्थांना रात्री तीन वाजतापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महिलांचा अर्धा वेळ पाणी भरण्यातच जातो. याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसचिवांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस भटकंती करावी लागते. ग्रामसचिव डोळ्यानेही दिसत नाहीत. कायमस्वरुपी उपाययोजना हव्यात.- वंदना मेश्राम,बचतगट अध्यक्ष एकझिराएकझिरा गावातील पाणीटंचाईची पाहणी केली. पाणीपुवठा विभागाच्या वरिष्ठांशी बोललो. प्रस्ताव आल्याबरोबर जानेवारीत बोअर करून देण्याची ग्वाही त्यांचेकडून मिळाली.- केवलराम काळे,माजी आमदारगावातील जुन्या विहिरीतून एकझिरावासीयांना पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरीत ब्लिचिंग टाकण्यात आले आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.पाचघरे,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सोनापूर

टॅग्स :water shortageपाणीकपात