शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

फेरमतमोजणीचे अपील फेटाळले

By admin | Updated: October 7, 2015 01:32 IST

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील एका जागेसाठी पडलेल्या मतांची फेरतपासणी करण्यात यावी, ....

अमरावती बाजार समिती : विकास इंगोले यांचे संचालकपद कायमअमरावती : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील एका जागेसाठी पडलेल्या मतांची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारे अपिल जिल्हाधिाकाऱ्यांनी फेटाळले आहे व त्याचबरोबर १६ सप्टेंबरला जाहीर केलेला निकाल कायम करण्यात आला आहे. त्यामुळे विकास जगन्नाथ इंगोले यांचे संचालकपद कायम राहिले आहे. गेल्या १५ सप्टेंबरला १८ सदस्यीय अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक घेण्यात आली. यात सेवा सहकारी संस्था (इमर मागासवर्गीय) मतदारसंघामधून विकास जगन्नाथ इंगोले ३६५ मते पडली. इंगोले यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र त्यानंतर पराभूत उमेदवार भय्यासाहेब निर्मळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे फेरतपासणीबाबत अर्ज दाखल केला. यात निवडणूक निर्णय अधिकारी, विकास इंगोले व निलेश मानकर यांना प्रतिवादी करण्यात आले. या मतदारसंघात १०४ मते अवैध ठरली. अवैध मतांमध्ये भैय्यसाहेब निर्मळ यांच्या नावासमोर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरविण्यात आलेली बाणफुली मारण्यात आली असून त्यामध्येच काही मतदारांनी मतपत्रिकेवर अंगठा, काही मतपत्रिकेवर बरोबर अशा खुना केल्या आहेत. अशा मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविल्या. अशा खुणेमुळे त्या मतपत्रिकेवरुन मतदारांनी ओळख होत नसल्याने फेरमतमोजणी करण्याचा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद नाकारुन जिल्हाधिकाऱ्यांनी विकास इंगोले यांचे संचालकपद कायम ठेवले आहे. मतमोजणीच्या दिवशी निर्मळ यांनी मतमोजणी लेखी अथवा तोंडी आक्षेप नोंदविला नाही. त्यासाठी निर्मळ यांच्याकडे पुरेसा अवधी सुद्धा होता. मात्र त्यानंतरही कुठलाही आक्षेप न आल्याने मतमोजणीची प्रक्रिया नियमसंगत असल्याचे आपले मत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. उल्लेखनीय याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अमरावती यांचा लेखी जबाब सुद्धा नोंदविण्यात आला होता. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी निर्मळ यांनी कोणताही आक्षेप न नोंदविल्याने त्यांचा अपिल नामंजुर करण्यात येत आहे व त्याचबरोबर इंगोले यांना विजयी ठेवण्याचा १६ सप्टेंबरचा निकाल कायम करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. सेवा सहकारी संस्था (इतर मागासवर्गीय) मतदार संघामध्ये वैध मतांची संख्या ९०७, अवैध मतांची संख्या १०४ होती. वैध मतांपैकी विकास इंगोले यांना ३६५ आणि भैय्यासाहेब निर्मळ यांना ३४८ मते पडली होती. (प्रतिनिधी)