शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

विशेष सर्वेक्षणात १९ हजार ४५ नागरिकांच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास अशा सर्व रूग्णांना शोधून त्याची तपासणी तसेच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण व शहरी भागात आतापर्यंत चार टप्प्यांत ही सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. ३० जूनअखेर पोर्टलवर ग्रामीण भागातील १६१०० नागरिकांच्या नोंदी झाल्या आहेत. यात जोखीम गटातील ८ हजार ६००, तर बाहेरून आलेले ५,३०० नागरिक आहेत.

ठळक मुद्दे'डोअर टू डोअर' मोहीम; आजारी व्यक्तींवर संनियंत्रण, ८ हजार ६०० नागरिक अति जोखमीतील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात पुन्हा 'अमरावतीकर करूया कोरोनावर वॉर' ही विशेष सर्वेक्षण मोहीम प्रत्येक गावात तसेच नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात २३ ते ३० जून दरम्यान राबविण्यात आली. डोअर टूू डोअर या आठवडाभराच्या मोहिमेत १९ लाख ४५ नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला. दरम्यान जोखीम गटातील नागरिक तसेच ८ जूननंतर गावात बाहेरून आलेले तसेच गावातील लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांच्या पोर्टलवर नोंदी घेण्यात आल्या आहेत.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास अशा सर्व रूग्णांना शोधून त्याची तपासणी तसेच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण व शहरी भागात आतापर्यंत चार टप्प्यांत ही सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. ३० जूनअखेर पोर्टलवर ग्रामीण भागातील १६१०० नागरिकांच्या नोंदी झाल्या आहेत. यात जोखीम गटातील ८ हजार ६००, तर बाहेरून आलेले ५,३०० नागरिक आहेत. विविध गावातील १० हजार ८०० नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व श्र्वसनाचा आजार असल्याची सर्वेक्षणात नोंद केली आहे. सर्दी, ताप, खोकला व श्र्वसनाचा त्रास असलेले, जोखीम गटातील, तसेच लक्षणे असलेल्या नागरिकांना व राज्य, जिल्हा व इतर जिल्ह्यातून आलेल्या अशा दोन्ही मिळून १६१०० व्यक्तींसोबत माहिती घेण्यासाठी थेट मोबाईलवर संवाद साधण्यात येत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय विकास अधिकारी यांचेमार्फत आजारी नागरिकांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यानुसार सर्वेक्षणाच्या कालावधीत गावस्तरीय आरोग्य व दक्षता समितीमार्फत गावातून नियमितपणे कामानिमित्त गावाच्या बाहेर ये-जा करणाऱ्या व्यक्तीची यादी तयार करून नोंद घेणे सदर नागरिकांकडून वैयक्तिक प्रवासा दरम्यान दक्षता कामाच्या ठिकाणी स्वच्छताविषयक व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच गावस्तरावरील दुकानदार व अन्य व्यावसायिकांना वेळोवेळी खबरदारीसाठी ग्रामपंचायत, कोराना दक्षता व गावस्तरीय समितीव्दारे सूचना दिल्या आहेत.आठवडाभराच्या विशेष सर्वेक्षण मोहिमेत आजारी असलेल्या व बाहेरून आलेल्या तसेच संख्यात्मक व गृहविलगीकरणात अससलेल्या व्यक्तींसोबत आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी कॉल सेंटरव्दारे संवाद साधला जात आहे. अशा व्यक्तींवर संनियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व कोरोना दक्षता समिती लक्ष ठेवून आहे.- अमोल येडगे,मुख्यकार्यकारी अधिकारी'कोरोना वॉर एएमटी'वर नोंदणीया मोहिमेत गावांमधील अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. असंसर्गजन्य आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब कर्करोग, क्षयरोग व इतर ६० वर्षांवरील ज्येष्ठांसह सर्वच नागरिकांच्या नोंदणी करण्यात आलेल्या आहेत. सर्वेक्षणातील सर्व माहितीच्या नोंदी 'कोरोना वॉर एएमटी' या पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या