शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमी ४८५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

अमरावती : कोरोना लसीकरणानंतरही संक्रमित रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक उच्चाक प्रस्थापित करीत आहे. मंगळवारी ४८५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, ...

अमरावती : कोरोना लसीकरणानंतरही संक्रमित रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक उच्चाक प्रस्थापित करीत आहे. मंगळवारी ४८५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, ही नोंद आतापर्यंत विक्रमी ठरली आहे, तर तिघांच्या मृत्यूनंतर कोरोना रुग्णांची मृत्युसंख्या आता ४४२ वर पोहोचली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी आढळून आल्याची नोंद करण्यात आली. मार्च २०२० ते १६ फेब्रुवारी २०२१या दरम्यान आतापर्यंत एका दिवसात ४८५ संक्रमित रुग्णसंख्या ही विक्रमी ठरली आहे. यापूर्वी २३ सप्टेंबर २०२० रोजी ४६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. नवीन वर्षात जानेवारीपासून पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासमोर चिंता वाढली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १२ फेब्रुवारी रोजी संचारबंदीचे आदेश जारी केले. मात्र, त्यानंतरही दरदिवशी कोरोना संक्रमितांचे निदान तीव्र गतीने होत आहे. कोरोना का कमी होत नाही, याचा शाेध घेण्यात आरोग्य यंत्रणाही नापास झाली आहे. महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणेने आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने मास्कचा वापर व शारीरिक अंतर न ठेवणारे नागरिक तसेच गर्दी करणाऱ्या स्थळांना कारवाईचे लक्ष्य करण्यात आले आहे. गत सात दिवसांत २,७५२ कोरोना पॉझिटिव्ह ही संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे.

---------------

मंगळवारी पॉझिटिव्ह २८.३६ टक्के

आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, मंगळवारी ४८५ संक्रमित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाकाळातील ही विक्रमी नोंद आहे. १ हजार ७१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८५ पॉझिटिव्ह आढळून आले असून, २८.३६ टक्के एवढे पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आहे.

--------------

१६ दिवसांत २४ रुग्णांचा मृत्यू

नवीन वर्षात कोराना संक्रमित रुग्ण वाढत असताना, मृत्युसंख्याही धोकादायक ठरत आहे. सोमवारी चौघांचा, तर मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४४२ कोरोनाग्रस्त दगावले. १ ते १६ फेब्रुवारी या १६ दिवसांत २४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ५ ते ७ फेब्रुवारी हे तीन दिवस वगळता सतत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या प्रकाशित होत आहे.

---------------------

सात दिवसांत २७५२ पॉझिटिव्ह रूग्ण

१० फेब्रुवारी - ३५९

११ फेब्रुवारी - ३१५

१२ फेब्रुवारी - ३६९

१३ फेब्रुवारी - ३७६

१४ फेब्रुवारी - ३९९

१५ फेब्रुवारी - ४४९

१६ फेब्रुवारी - ४८५

------------------------------