शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचे धान्य विक्रीला, तीन रुपये किलोने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 15:43 IST

Amravati News शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदाराकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच ३ रुपये किलोचा तांदूळ १० ते १५ रुपये प्रतिकिलोने खुल्या बाजारात विकत आहेत.

ठळक मुद्देगल्लोगल्ली फिरून ग्रामीण भागातून खरेदी केले जातात तांदूळ

लोकमत न्यूज नेटवर्क : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदाराकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच ३ रुपये किलोचा तांदूळ १० ते १५ रुपये प्रतिकिलोने खुल्या बाजारात विकत आहेत. व्यापाऱ्यांचे दलाल गल्लोगल्ली फिरून रेशनचा तांदूळ खरेदी करीत आहेत. जिल्हाभरातून दररोज शेकडो क्विंटल तांदूळ अशाप्रकारे जमा केला जातो. महसूल प्रशासन मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.

गोरगरिबांनी नेलेला महिनावारी तांदूळ, गहू खुल्या बाजारात खरेदी करणारे रॅकेट सक्रिय असून ग्रामीणसह शहरी भागातूनसुद्धा तांदूळ खरेदी करणारे दलाल गल्लोगल्ली भटकंती करून १० ते १५ रुपये दराने तांदूळ खरेदी करतात. अशाप्रकारे गावागावात जाऊन शेकडो क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्यांच्या घशात घातला जात असल्याची ओरड वरूड तालुक्यात आहे. एका दिवसाला १० ते १५ क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्याला विकला जातो. व्यापारी या फिरस्त्या दलालांकडून घेतलेला तांदूळ ट्रकमधून भंडारा गोंदियाकडे रवाना करतो. फिल्टर करून तोच तांदूळ एकतर शासनाला किंवा खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने विकतो. अशाप्रकारे शासनाच्या योजनेला हरताळ फासण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे.

तीन रुपये किलो तांदूळ

कोरोनाकाळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली. यामध्ये प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्यात येते. यात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ असे सूत्र आहे, तर अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गतसुद्धा धान्यवाटप केले जाते. तर सरकारकडून तांदूळ भरपूर मिळत आहे. ते आपले अन्नच नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी गहू मिळविण्यासाठी तांदूळ विकत असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. तांदळाचा साठा करून तो जिल्ह्याबाहेर विकण्याचा प्रकार वारंवार उघडकीस येतो. अलीकडेच मोठा तांदूळ साठा पकडला गेला आहे.

तक्रार आल्यास चौकशी व कारवाई करू

केंद्र व राज्य शासनाकङून गरजू लाभार्थींना रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरवठा केला जातो. अशा प्रकारच्या धान्यविक्रीबाबत पुरवठा विभागाकडे कुणाचीही तक्रार नाही. तक्रार आल्यास चौकशी व कारवाई करू.

- अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :foodअन्न