शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

खोडके गटाच्या रिना नंदा महापौर - उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर

By admin | Updated: September 9, 2014 23:07 IST

अमरावतीच्या १४ व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा तर उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे विजयी झालेत. या निवडणुकीत दोघांनीही प्रत्येकी ४७ मते

सत्तेची पुनर्स्थापना : रावसाहेब शेखावत, संजय खोडके यांच्यात हातमिळवणीअमरावती : अमरावतीच्या १४ व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा तर उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे विजयी झालेत. या निवडणुकीत दोघांनीही प्रत्येकी ४७ मते प्राप्त केलीत. शेख जफर यांना दुसऱ्यांदा उपमहापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके यांनी हातमिळवणी करून महापालिकेत सत्ता पुनर्स्थापित केली.महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या पीठासीनाखाली पार पाडली. आयुक्त अरुण डोंगरे, नगरसचिव मदन तांबेकर यांनी प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक दुपारी १.१५ वाजता संपली. दरम्यान महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्जाची छानणी प्रक्रिया आटोपताच प्रथम सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी प्राप्त ८ उमेदवारांच्या अर्जापैकी चार सदस्यांनी अर्ज मागे घेतला. यात भाजपच्या मंजुषा जाधव, हेमलता साहू, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री मोरय्या तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या हमीदा बानो शेख अफजल चौधरी यांचा समावेश होता. महापौरपदासाठी रिंगणात राष्ट्रवादीच्या सपना ठाकूर, सेना- भाजप, रिपाइंच्या रेखा तायवाडे, बसपाच्या गुंफाबाई मेश्राम तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या रिना नंदा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे गणित बिघडलेमहापौरपदावर डोळा ठेवून बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांना काँग्रेस आपल्याशीच आघाडी करेल, अशी आशा होती. या आघाडीसाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी काँग्रेसवर दवाबतंत्राचाही वापर केला होता. परंतु या दवाबतंत्राची कोणतीही जादू काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर चालली नाही. अखेर काँग्रेसने महापालिकेत सत्तेत कायम राहण्यासाठी संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटशी हातमिळवणी करुन पूर्वीच्या करारानुसार त्यांना महापौर तर आपल्याकडे उपमहापौरपद कायम ठेवत शहराच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.बसपने ‘व्हीप’ काढलाच नाहीमहापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहा सदस्य संख्या असलेल्या बहुजन समाज पक्षाने कोणाला मतदान करावे, याबाबत अधिकृत ‘व्हीप’ काढला नाही. मात्र, या निवडणुकीत बसपने महापौरपदासाठी गुंफाबाई मेश्राम तर उपमहापौरपदासाठी दीपक पाटील यांचे अर्ज कायम ठेवले होते. विजयासाठी संख्याबळ नसताना देखील बसपने महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढविली. त्यांना केवळ तीन मतांवर समाधान मानावे लागले. परंतु गटनेता अजय गोंडाणे, दीपमाला मोहोड व अलका सरदार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या बाजुने मतदान केले.