शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

राणा लॅन्ड मार्क प्रकरण, आरोपपत्र दाखल होणार

By admin | Updated: December 20, 2014 00:11 IST

राणा लँडमार्क फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ७२२० पानांचे आरोपपत्र तयार केले असून शनिवारी आरोपत्र पोलिसांतर्फे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

अमरावती : राणा लँडमार्क फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ७२२० पानांचे आरोपपत्र तयार केले असून शनिवारी आरोपत्र पोलिसांतर्फे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश अणे यांनी सांगितले की, २५ सप्टेंबर २०१४ रोजी कोतवाली ठाण्यात शिरजगाव येथील शरद कुकडे यांच्या तक्रारीवरुन राणा लँडमार्कचे संचालक योगेश राणा आणि त्याचे भाऊ चंद्रशेखर राणा व व्यवस्थापक अभिजित लोखंडे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी योगेश राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. चंद्रशेखर राणा आताही फरार आहे. तर लोखंडे यांची जामिनावर सुटका करण्यात आली. कमी पैशात फ्लॅट देण्याचे आमीष देऊन शेकडो नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती. एकूण ४१९ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. राणा लँड मार्कने एकूण ८ कोटी ८१ लाख ९६ हजार २९५ रुपयांनी फसवणूक केली आहे. पोलीसांनी तपास करतांना योगेश आणि चंद्रशेखर राणा यांचे ७ बँक खाते गोठविले आहे. त्यात ५२ हजार ८६६ रुपये जमा आहे. याव्यतिरिक्त घरची झडती घेतली असता ६३ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी ९० दिवसाच्या आत या प्रकरणाची तपासणी करुन एकूण ७२२० पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. हे आरोपपत्र शनिवारी न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)