शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

राणा भ्रष्टाचारी, पुरावे उपलब्ध

By admin | Updated: December 29, 2016 01:46 IST

आ. रवि राणा यांनी जमीन व्यवहारातून भ्रष्टाचार केला असून त्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याची माहिती

पत्रपरिषद : आनंदराव अडसुळांचा पलटवार अमरावती : आ. रवि राणा यांनी जमीन व्यवहारातून भ्रष्टाचार केला असून त्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याची माहिती खा. आनंदराव अडसूळ यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून दिली. दोन दिवसांपूर्वी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आ. रवि राणांचे बडनेरातील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या अ‍ॅट्रॉसिटीबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर खा. अडसुळांनी पत्रपरिषद घेऊन आ. राणांचा प्रसिद्धीसाठीचा खटाटोप असल्याचा आरोप केला. खा. अडसुळांच्या मते, युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जात विचारुन महिलेला मारहाण किंवा धक्का दिला नसेल. पोलिसांनी अ‍ॅट्रासिटी गुन्हे दाखल करताना सीसीटीव्हीचे फुटेज तपासणे आवश्यक होते. मात्र, बडनेराचे ठाणेदार दिलीप पाटील राणांच्या दबावात असून त्यांनी कोणतीही तपासणी अथवा शहानिशा न करता कार्यकर्त्यांवर अ‍ॅट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप असला तरी जात विचारुन मारहाण केली जाते काय, असा सवाल अडसुळांनी उपस्थित केला. मी स्वत: अनुसूचित जातीचा असून माझे कार्यकर्ते मागासवर्गिय महिलेला शिवीगाळ करुन मारहाण करणार नाहीत, असा दावा त्यांनी के ला. आ. राणांनी सेनेला आव्हान देणारी भाषा वापरल्याने कार्यकर्त्यांनी उद्रेक केला. त्यामुळे कार्यालयाची तोडफोड केली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आ. राणांच्या कार्यालयाची तोडफोड झाली तर अ‍ॅट्रासिटीचा प्रश्न कु ठे येतो, राणांनी केलेला हाप्रकार म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करणारा आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दाखल केलेले अ‍ॅट्रासिटीचे गुन्हे मागे घेतले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरणार, असा ईशारा अडसुळांनी दिला. मुख्यमंत्री गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पोलिसांनी शिवसैनिकांवर दाखल केलेल्या अ‍ॅट्रासिटीबाबत त्यांना वस्तुस्थिती कळविली जाईल, असे अडसूळ म्हणाले. राणांनी राजकारणाचा फायदा घेऊन सरकारी जमिनी हडपल्यात. त्याचे पुरावे उपलब्ध असल्याचेही अडसुळांनी सांगितले. महसूल विभागाच्या जमिनीत भ्रष्टाचार करताना राणांनी राजकारणाचा कसा वापर केला, हे जाणून घेतले तर मोठी पोलखोल होईल, असे ते म्हणाले. नरखेड रेल्वे पुलाचे उद्घाटन राणांनी कशाच्या आधारे केले, हे माहित नाही. मात्र राणांकडे नैतिकता आहे काय, असा सवाल अडसुळांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेनेची परंपरा जशास तसे उत्तर देण्याची असल्यामुळे राणांना उत्तर देण्यात आले, हीबाब अडसुळांनी स्पष्ट केली. पत्रपरिषदेला माजी आ. संजय बंड, प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, सुनील खराटे आदी उपस्थित होते. शेतकरी हितासाठी राज्यभरात मोर्चे शिवसेना व आ.बच्चू कडू यांच्या प्रहारच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचा हितासाठी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचे नियोजन होते. तसा प्रस्तावही आ. कडू यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मोर्चा काढण्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. मात्र,ही समस्या राज्यभराची असल्याने राज्यस्तरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जानेवारी रोजी मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आल्याची माहिती खा. अडसुळांनी दिली.