शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ उड्डाण पुलाचे भिजतघोंगडे कायम!

By admin | Updated: March 8, 2015 00:13 IST

यापूर्वी आमदार, खासदारांनी भूमिपूजन केल्यानंतरही आजतागायत सुरु न झालेल्या येथील राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचे भिजत घोंगळे कायम आहे.

अमरावती : यापूर्वी आमदार, खासदारांनी भूमिपूजन केल्यानंतरही आजतागायत सुरु न झालेल्या येथील राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचे भिजत घोंगळे कायम आहे. गत आठवड्यात या पुलाच्या निर्मितीची महापालिकेने चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली. मात्र दोनच कंत्राटदारांच्या निविदा प्राप्त झाल्यात. त्यातही ४३ टक्के जास्त दराने निविदा आहेत. त्यामुळे कंत्राटदारांना ९ मार्च रोजी महापालिका आयुक्तांनी वाटाघाटीकरीता बोलावल्याची माहिती आहे. परंतु महापालिकेने उड्डाणपूल निर्मितीचे काम हे राज्य रस्ते विकास महामंडळाला सोपवावे, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.एक दोन नव्हे तर चारवेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचा मार्ग सुकर झाला नाही. गत आठवड्यात या पुलाच्या निर्मितीसाठी उघडण्यात आलेल्या निविदेत केवळ दोनच कंत्राटदारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात नागपूर येथील खरे अ‍ॅन्ड तारकुंडे तर हैद्राबाद येथील नागार्जून कन्स्ट्रक्शन कंपनीचा समावेश होता. एकुण ४८ कोटी रुपये खर्चून राजापेठ उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे. मात्र, आतापर्यत राज्यात एकाही महपालिकेने उड्डाणपूल निर्माण केला नसल्याने हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सोपवावे, अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही उड्डाणपुलासाठी कंत्राटदारांकडून फार प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने या पुलाची निविदा प्रक्रिया राबविण्यापुर्वीच राज्य शासनाकडे अतिरिक्त १८ कोटींची मागणी केली आहे. यापुर्वी राज्य शासनाने राजापेठ उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी १० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. रेल्वे प्रशासनाचा वाटा हा १३ कोटी रुपये असून त्यांच्या हद्दीतील कामे हे रेल्वे प्रशासन करणार असल्याची माहिती आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी यापुर्वी नागरिकांनी रेल्वे रोको, रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राजापेठ रेल्वे क्रॉसींगवर होणारी वाहतूक कोंडी संपविण्यासाठी उड्डाणपूल निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरीता आमदार, खासदार, नगरसेवक आदींनी पुढाकार घेतला. सातत्त्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा देखील करण्यात आला. दोन वेळा नकाशा बदलविण्याचा प्रसंग महापालिकेवर ओढावला. अखेर कसेतरी बडनेरा मार्ग, दस्तुरनगर मार्ग असा हा उड्डाणपूल निर्माण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मध्यतंरी निधीअभावी या पुलाच्या निविदा प्रक्रिया राबविणे अशक्य होते. राज्य शासनाने १० कोटींचे अनुदान दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यिाचा मार्ग सुकर झाला. परंतु जास्त दराने निविदा प्राप्त झाल्याने महापालिका प्रशासनापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. राज्य शासन, रेल्वे, महापालिका असे संयुक्तपणे निधीतून हा पूल निर्माण करण्याचे धोरण आहे. निधीची वाणवा आणि आमदार, खासदारांचा विरोध अशात राजापेठ उड्डाणपुलाची निर्मिती कशी होणार? हा गंभीर प्रश्न आहे.