शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्सच्या विळख्यात गोरगरीब जनता!

By admin | Updated: November 21, 2015 00:13 IST

शासकीय बचत गटापेक्षा कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ‘बेसिक’ ने मागील तीन वर्षांत तालुक्यातील आठ जणांचा बळी घेतला आहे़

४५ गावांमध्ये ‘बेसिक’चा व्याप : चक्रवाढ व्याज घेतेय गरिबांचा जीवधामणगाव रेल्वे : शासकीय बचत गटापेक्षा कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ‘बेसिक’ ने मागील तीन वर्षांत तालुक्यातील आठ जणांचा बळी घेतला आहे़ ४५ गावे या फायनान्सच्या विळख्यात अडकली असून चक्रवाढ व्याजामुळे गरिबांचे जीव जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़तालुक्यात महिला बचतगटांना विविध बँकेच्यावतीने प्रशासकीय अधिकारी कर्ज वितरण करीत असले तरी हे कर्ज मंजूर होण्यास अवधी लागतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात ‘फायनान्स’च्या माध्यमातून ‘बेसिक’ने डोके वर काढले आहे़ १० ते २० महिलांचा बचतगट तयार केल्यानंतर संबंधित कंपनी या बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देते़ दर आठवड्याला बाजाराच्या दुसऱ्या दिवशी वसुली केली जाते. सर्व महिलांनी दिलेल्या कर्जाचा हप्ता गोळा करून द्यावा, अशी अट या फायनान्स कंपनीची आहे़ प्रत्येक आठवड्याला यातील कर्मचारी घरी जाऊन पैसे वसुलीचे काम करतात़ एखाद्या महिलेने हप्ता कमी देण्याचा प्रयत्न केला तर संबंधित कर्मचारी हा हप्ता स्वीकारत नाहीत. सर्व महिला एकत्र येऊन या महिलेला कर्ज हप्ता वसूल करण्यासाठी बाध्य करतात़ यातूनच संबंधित महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कंपनीचे कर्मचारी करीत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.सावकारीपेक्षा दुप्पट वसुलीखासगी सावकार घरातील दागिने गहाण ठेवून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतात.परंतु मागील वर्षभरात सावकारांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न शासनाच्यावतीने सुरू झाल्यामुळे याचा फायदा फायनान्स कपंन्यांनी घेणे सुरू केले आहे़ छायाचित्र, रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्डची झेरॉक्स प्रत आदी दस्तऐवज संबंधित गावातील कंपनीने नियुक्त केलेल्या एजन्टकडे दिली जातात. ही कागदपत्रे घेतल्यानंतर सुपरवायझर एका फॉर्मवर पती-पत्नीची सही घेऊन १० ते १५ हजार रूपये कर्ज उपलब्ध करून देतात. कर्जवसुली व त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येत असल्याचे चित्र आहे.