बंदी दर्शनाल सांगतो, नेहमीच येतो कारागृहात गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:23 PM2018-07-23T23:23:13+5:302018-07-23T23:24:49+5:30

मध्यवर्ती कारागृहात नेहमीच गांजा येतो, बंदीजन मोबाईलवरसुद्धा बोलतात, यासाठी बंदीजनांना मोठी रक्कम मोजावी लागत असल्याची पोलखोल बंदी सूरज दर्शनाल याने पोलिसांसमोर केली. गांजा प्रकरणात अमरावती मध्यवर्ती कारागृहात चालणारे विविध गैरप्रकार पोलीस चौकशीमुळे उघड झाले. सोमवारी पोलिसांनी भाजीपाला व धान्यपुरवठा करणाऱ्यांचे बयाण नोंदविले.

Prohibition says, Banana always comes in prison | बंदी दर्शनाल सांगतो, नेहमीच येतो कारागृहात गांजा

बंदी दर्शनाल सांगतो, नेहमीच येतो कारागृहात गांजा

Next
ठळक मुद्देकारागृहातील कारभाराची पोलखोलधान्यपुरवठा करणाऱ्यांची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मध्यवर्ती कारागृहात नेहमीच गांजा येतो, बंदीजन मोबाईलवरसुद्धा बोलतात, यासाठी बंदीजनांना मोठी रक्कम मोजावी लागत असल्याची पोलखोल बंदी सूरज दर्शनाल याने पोलिसांसमोर केली. गांजा प्रकरणात अमरावती मध्यवर्ती कारागृहात चालणारे विविध गैरप्रकार पोलीस चौकशीमुळे उघड झाले. सोमवारी पोलिसांनी भाजीपाला व धान्यपुरवठा करणाऱ्यांचे बयाण नोंदविले.
राज्यातील सर्वात सुरक्षित कारागृहात गणल्या जाणाºया येथील मध्यवर्ती कारागृहात काय-काय प्रकार चालतात, यावर बंदीजनानेच आता तोंड उघडल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. पोलीस चौकशीत कारागृहातील गंभीर गैरप्रकाराची शासन कशी दखल घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. १८ जुलै रोजी मध्यवर्ती कारागृहातील उपअधीक्षक गायकवाड व बंदी सूरज दर्शनाल धान्य गोदामात गेले असता, त्यांना चनाडाळीच्या पोत्यात गांजा आढळून आला. सकाळी गांजा सापडला असता, जेल प्रशासनाने लपाछपी करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. रात्रीच्या वेळी जेल प्रशासनाकडून पोलिसात तक्रार करण्यात आली. फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशी प्रारंभ करून काही बंदीजनांचे बयाण नोंदविले. सोमवारी फे्रजरपुºयाचे पोलीस उपनिरीक्षक लेवटकर यांनी बंदी सूरज दर्शनाल याचे बयाण नोंदविले. त्याच्या बयाणातून कारागृहातील धक्कादायक माहिती पुढे आली. दर्शनाल याने पोलिसांना सांगितल्यानुसार, कारागृहात नेहमीच गांजा येत असल्याचे स्पष्ट होत आहे. गांजा खरेदी करण्यासाठी बंद्यांना मोठी रक्कम द्यावी लागते. त्याचप्रमाणे कारागृहात मोबाईलवर बोलण्याची देखील संधी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार दर्शनालने पोलिसांसमोर उघड केला. कारागृहातील हे गंभीर प्रकार तेथील पोलिसांच्या संगनमताने होत असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बंदीजनांना भेटणारे पुरवितात पैसे
बंदीजनांना न्यायालयात हजर केल्यावर त्याचे नातेवाईक भेटतात. त्यावेळी नातेवाईक बंद्यांना पैसे पुरवितात, ते पैसे सहजासहजी कारागृहात नेता येत नसल्यामुळे त्या नोटाची घडी करून बंदीजन तोंडात लपवून ठेवतात. त्यानंतर कारागृहात गेल्यानंतर त्या पैशांचा वापर केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

कारागृहात गांजा आढळल्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणातील सर्व बाजूने पारदर्शक तपास करू. जे तत्थे बाहेर येतील, त्यावरून संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल.
- चिन्मय पंडित,
पोलीस उपायुक्त

Web Title: Prohibition says, Banana always comes in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.