शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

लोकसहभागातून हवेच्या प्रदूषणाला अटकाव

By admin | Updated: February 17, 2017 00:20 IST

हवेच्या वाढत्या प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

महापालिकेचा पुढाकार : घनकचरा न जाळण्याचे आवाहनअमरावती : हवेच्या वाढत्या प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. विविध विकासकामे करताना निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणाऱ्या धुरांमुळे हवेचे प्रदूषण होते. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठीलोकसहभागाची साद घातली आहे.महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ १२१.६५ चौ. मीटर असून शहराची लोकसंख्या सुमारे ७ लाख आहे. शहराची विकासाकडे वाटचाल होत असताना पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. हवा प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानेही आदेश निर्गमित केले आहेत तथा विकासकामे व बांधकामापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट तसेच त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण नियंत्रणात आणण्याकरिता केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिशानिर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात घनकचरा जाळल्यास ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी करून फौजदरी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत. शहरातील प्रदूषणाचे प्रमाणअमरावती : त्याअनुषंगाने हवा प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी लोकसहभागाचा संकल्प महापालिकेने सोडला आहे. दैनंदिन जीवनातीस काही सवयी बदलून प्रत्येक नागरिक हवा प्रदूषण नियंत्रित करण्यास सहकार्य करू शकतो, असे निरीक्षण महापालिका यंत्रणेने नोंदविले आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग कसा असावा, याबाबत काही उपाययोजना महापालिकेने जाहीर केल्या आहेत. घनकचरा जाळू नये, याशिवाय बांधकाम करणे व पाडण्यासंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. नागरिकांनी हवा प्रदूषण टाळण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी केल्यात आणि नियमावलीचे पालन केले तर हवेच्या प्रदूषणात वाढ होणार नाही. हवेच्या प्रदुषणाला अटकाव घालण्यासाठी जनतेने सजग होण्याची गरज असून यासंदर्भात अडचण असल्यास त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सल्फर, नायट्रोजनचे प्रमाणशहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत ‘अ‍ॅम्बीयंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग’कडून उपलब्ध आकडेवारीनुसार रहिवासीक्षेत्रात उन्हाळ्यामध्ये नायट्रोजन आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईडचे प्रमाण अनुक्रमे ११ ते १५ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर व ९ ते १४ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर आढळले. हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. औद्योगिक क्षेत्रात उन्हाळ्यामध्ये नायट्रोजन आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईडचे प्रमाण अनुक्रमे ११ ते १६ व १० ते १५ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर इतके आढळले असून हेप्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. धुळीकणांचे प्रमाण ५७ ते ९७ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक आढळले.