शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘एफडीए’विरोधात चार पानी अहवाल शासनाला सादर

By admin | Updated: July 16, 2016 00:11 IST

यामध्ये गुटख्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांचे क्रमांक व पत्ते आढळून आले.

अमरावती : यामध्ये गुटख्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांचे क्रमांक व पत्ते आढळून आले. त्याआधारे पुन्हा पथकाने धाडसत्र राबविले. मात्र पथक पोहचण्यापूर्वीच येथून माल गायब करण्यात आला होता. या विक्रेत्याला महसूल पथकाने अन्न व औषधी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या स्वाधिन करण्यात आले असता त्यांनी या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यास नकार दिला असल्याचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी सांगितले. या कारवाईत दोन्ही तहसीलदारांसमवेत नायब तहसीलदार मुन्ना मावळे, नंदकिशोर मधापूरे, नरेंद्र कुरळकर, सदानंद सांगावे, अमोल जवळकर, प्रमोद क्षीरसागर, मळसने, भगत आदी उपस्थित होते. अन्न व औषधी विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव तरी या विभागाचा कारभार ढिसाळ आहे. यामुळे एफडीए विरोधात चार पानांचा अहवाल शासनाला सादर केला आहे. व जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले ना.गिरीष बापट यांना देखील एफडीएच्या एकंदरीत कारभाराची माहिती दिली असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले. १९ मार्चच्या २०१६ शासन आदेशाद्वारे सर्व विभागाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने प्रदान केले आहे. त्या अनुषंगाने गुटखा विक्री व गोदामावर महसूल विभागाद्वारे कारवाई करण्यात येत आहे.व जोवर एफडीए सक्रिय होणार नाही तोवर महसूल विभागाच्या धाडसत्र सुरुच राहणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात अधिकृत १५३ गोदाम आहेत. मात्र अनधिकृत गोदाम ३०० चेवर आहे. यासाठी शहरातील गोदामांचे बाजार परवाने तपासनी करण्याविषयी महापालिकेला कळविण्यात आले आहे. बाजार परवान्याची तपासनी झाल्यास अनधिकृत गोदाम उघडकीस येतील व पर्यायाने महापालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडेल असे गित्ते यांनी सांगितले. अनेक गोदामाचे मालक हे गुटखा व्यापारीच असल्याचे उघड झाले आहे. जेवढा माल कारवाईत जप्त केला जातो तेवढाच माल त्या कंपनीद्वारा व्यापाऱ्याला कंपनीद्वारा मोफत मिळते त्यामुळे व्यापारी कारवाईला जुमानत नाही मात्र, महसूल विभागाचे धाडसत्र असेच सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.