शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरीपूर्वी ‘ती’ची अकाली एक्झिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST

फोटो पी ०१ कांडलकर बाहेरच्या पानासाठी मोर्शी : बरोबर चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी तिला नवरी म्हणून हळद लागली, अगदी ...

फोटो पी ०१ कांडलकर

बाहेरच्या पानासाठी

मोर्शी : बरोबर चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी तिला नवरी म्हणून हळद लागली, अगदी त्याच दिवशी तिने घेतलेली अकाली एक्झिट समाजमनाला हुरहुर लावून गेली. जिवापल्याड प्रेम असणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या स्पंदनला मागे ठेवून ती दिगंताच्या प्रवासाला निघून गेली. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे हा हृदयद्रावक प्रसंग घडला. ३० जानेवारी रोजी यामिनी कांडलकर यांची अवघ्या ३१ व्या वर्षी प्राणज्योत निमाली. मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरीच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी यामिनी भरल्या संसारातून निघून गेली.

१ फेब्रुवारी २०१७ रोजी वरूड येथील यामिनी मारोतराव तरार हिचा विवाह गुरुकुंज मोझरी येथील अमित कांडलकर यांच्याशी झाला. त्यांच्या संसारवेलीवर ‘स्पंदन’ नामक फूलही बहरले. सारे काही सुरळीत सुरू असताना यामिनीला किडनीच्या आजाराने ग्रासले अन् सुरू झाला डायलिसीस व दवाखान्याच्या येरझारा. एक दीड वर्षांच्या काळात यामिनीची प्रकृती ‘कधी तोळा कधी मासा’ अशी राहिली. बघता बघता कन्या स्पंदन तीन वर्षांचीदेखील झाली. यामिनीचा औषधोपचार सांभाळून अमितने मुलगी व कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मात्र, अशातच ३० जानेवारी रोजी पहाटे यामिनीचा श्वास थांबला. गुरुकुंज मोझरी येथील राहत्या घरी तिचे निधन झाले. आईच्या मृत्यूची यत्किंचितही कल्पना नसलेली स्पंदन खेळत होती. मात्र, तिचे अबोध लीलांनी उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. चार वर्षांपूर्वी जिला लग्नाची हळद लावली गेली, त्याच दिवशी चार वर्षांनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतिमत: सवाष्ण स्त्रीचा साज चढविण्यात आला. हळदीकुंकवाने औक्षण करण्यात आले. मात्र, ते औक्षण कांडलकर व तरार कुटुंबीयांसाठी मोठे हृदयद्रावक ठरले.

---------------