शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

प्री-पेड आॅटोरिक्षाला मूर्तरुप

By admin | Updated: February 26, 2016 23:59 IST

प्रवाशांना वाजवी दरात हक्काची सुरक्षित वाहतूक सेवा मिळावी, यासाठी प्री-पेड आॅटोरिक्षा संकल्पना हळूहळू मूर्त रुपाला येत आहे.

सर्वेक्षण संपले : लवकरच आरटीएची बैठक प्रदीप भाकरे अमरावतीप्रवाशांना वाजवी दरात हक्काची सुरक्षित वाहतूक सेवा मिळावी, यासाठी प्री-पेड आॅटोरिक्षा संकल्पना हळूहळू मूर्त रुपाला येत आहे. यासाठी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून २४ फेब्रवारीला संयुक्त सर्वेक्षण घेण्यात आले. त्याचा अहवाल आला असून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक प्रस्तावित आहे. अपूर्वा देऊळगावकरच्या अपघाती मृत्युनंतर उपायुक्त नितीन पवार यांनी शहराचा ‘ट्रॅफिक स्टेटस रिपोर्ट’ बनवला. यात प्री-पेड आॅटोची संकल्पना आकाराला आली. त्या अनुषंगाने बुधवारी दिवसभर पवार यांच्या नेतृत्त्वात बडनेरा रेलवे स्टेशन ते एसटी डेपो, पोटे इंजिनिअरिंग कॉलेज, पठान चौक ते वलगांव रोड, पठान चौक ते भातकुली, जुना बायपास मार्गे अर्जुननगर व बडनेरा ते राजकमल चौकमार्गे इतर ठिकाणांचे अंतर मोजण्यात आले. हकिम समितीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरटीओकडून प्रती किलोमिटर व टप्पानिहाय वाहतुकीचे दर निश्चित केले जातील. याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. प्रस्ताव मान्य झाल्यानंतर खासगी कंत्राटदार किंवा आॅटोरिक्षा संघटनेच्या मदतीने ही प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बुथ कार्यालय असतील. अशी असेल प्री-पेड सेवा निश्चित ठिकाणी प्री-पेड आॅटोरिक्षा थांबे सुरु केले जातील. त्यामध्ये बुथ कार्यान्वित असतील. प्रवाशांना पैसे भरून पावती दिली जाईल. त्यावर आॅटो क्रमांक असेल. त्यानंतर प्रवाशांना प्रवास करता येईल, अशी सर्वसाधारण योजना आहे. शहरात प्री-पेड आॅटोरिक्षा वाहतूक सुरु करायचीच आहे. मात्र, त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव आरटीएसमोर ठेवावा लागेल. त्या दृष्टीने पूर्वतयारी व सर्वेक्षण करण्यात आले आहे. अन्य यंत्रणेच्या सहकार्याने लवकरच एक परिपूर्ण प्रस्ताव तयार केला जाईल. - नितीन पवार पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२