शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक अर्जासाठी हिरावला गरिबांचा घास

By admin | Updated: April 30, 2015 00:26 IST

नागरिकांना लवकरच बायोमेट्रिक पद्धतीने रेशनधान्य मिळणार आहे. यासाठी आधारकार्ड व माहिती रेशनदुकानदार संकलित करुन फार्म भरत आहेत.

अमरावती : नागरिकांना लवकरच बायोमेट्रिक पद्धतीने रेशनधान्य मिळणार आहे. यासाठी आधारकार्ड व माहिती रेशनदुकानदार संकलित करुन फार्म भरत आहेत. दुकानातच सर्व माहिती शिधाधारकांकडून मिळावी, असा अनेक दुकानदारांचा अट्टाहास आहे. जे शिधापत्रिकाधारक आधारकार्डच्या झेरॉक्स आणतील त्यांनाच रेशनधान्य देण्याचा तुघलकी प्रकार अनेक दुकानात सुरु आहे. गुरुवार ३० एप्रिल ही अखेरची तारीख असल्याने हजारो नागरिक रेशनधान्यापासून वंचित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधार कार्डची सक्ती करता येत नाही. परंतु संगणकीकृत शिधापत्रिकांसाठी असलेल्या फार्मची प्रक्रिया लवकर संपावी यासाठी कार्डवर असलेल्या सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स ही रेशन पाहिजे असल्यास सोबत आणावी अन्यथा रेशनधान्य देणार नाही, असा पावित्रा अनेक दुकानदारांनी घेऊन शिधाधारकांना परत पाठविले आहे. यामुळे गरिबांचा घास हिरावल्या जात आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिका धारकांना नि:शुल्क असणाऱ्या या अर्जाचे अनेक दुकानदार १० रुपये वसुल करीत आहे. वास्तविकता हा फार्म भरण्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति फार्म ५ रुपये मिळत आहे. विशेष म्हणजे दुकानदारांनी हा फार्म भरण्यासाठी माणसे नेमली आहेत.नि:शुल्क अर्जाचे १० रुपयेसंगणकीकृत शिधापत्रिकांसाठी असणारे ६ लाख ५ हजार १२१ प्रपत्र शिधापत्रिकांकडे पोहचविली असल्यास पुरवठा विभागाचा अहवाल असला तरी फक्त १ हजार ९०६ रेशनदुकानदारांना वितरित करण्यात आली आहे व हे दुकानदार त्यांना वाटेल त्या पद्धतीने प्रपत्र भरण्याची कार्यवाही करीत आहे. हे प्रपत्र नि:शुल्क आहे. प्रत्येक प्रपत्रासाठी रेशन दुकानदाराला ५ रुपये मिळणार आहे. अनेक दुकानात या अर्जासाठी दहा रुपये घेतले जातात.नागरिकांना आधारकार्डची सक्ती करता येत नाही. आधारकार्डची झेरॉक्स दिली नाही म्हणून रेशन धान्य रोखले जाऊ शकत नाही. याविषयी रेशन दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. शिधापत्रिका धारकांनीही आधारकार्ड देण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. - बी.के. वानखडे,जिल्हा पुरवठा अधिकारी.प्रपत्र भरण्यासाठी पुरवठा विभागाद्वारा रेशन दुकानदारांवर दबाव टाकण्यात येत आहे. आधारकार्डची सक्ती करता येत नाही. याविषयी सर्व तालुकाध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत. पुरविण्यात आलेल्या प्रपत्रात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. - सुरेश उल्हे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदारसंघ.