शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गुडेवारांच्या बदलीचे राजकारण निषेधार्ह

By admin | Updated: May 14, 2016 00:02 IST

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीच्या संदर्भात महापालिकेसह राजकारणातील सर्व विरोधक

शहर भाजप : ‘बंद’ जनहितविरोधीअमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीच्या संदर्भात महापालिकेसह राजकारणातील सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपला बदनाम करण्याचा व राजकीय पोळी शेकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. असा आरोप शहर भाजपने केला आहे. मनपातील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व काही विविध गटांचे नगरसेवक एकत्र येऊन गुडेवार यांच्या कथित बदलीचे राजकारण करीत आहेत. आपली बदली होणार, हे संकेत स्वत:च गुडेवार यांनी प्रसार माध्यमांना दिले. त्यानंतर शहरातील व्यवहार ठप्प करून दोन दिवसांपासून शहराला वेठीस धरले जात आहे. ‘अमरावती बंद’ जनहिताच्या विरोधात असल्याने या आंदोलनालाही आपला विरोध असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. गुडेवार यांची बदली झाली की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे, ही प्रशासनातील नियमित बाब आहे. त्यासाठी राजकारण होणे दुर्र्दैवी आहे. गुडेवारांच्या बदलीचा आडोसा घेऊन पालकमंत्री आणि आ. सुनील देशमुख यांच्यावर नाहक शिंतोडे उडवले जात आहेत. महापालिका निवडणुकीतील भाजपच्या आव्हानाला धास्तावलेल्यांनी हा प्रचार चालविल्याचे भाजपचे म्हणणे आहे.भाजपचे शहर-जिल्हा अध्यक्ष जयंत डेहनकर, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, किरण महल्ले, मनपा गटनेता संजय अग्रवाल, सरचिटणीस चेतन गावंडे, अनिल आसलकर, महिला आघाडी अध्यक्ष रिता मोकलकर यांनी या राजकारणाचा निषेध केला आहे.