शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मुभा तर सामान्यांकडून दंड वसूल

By admin | Updated: August 14, 2015 00:59 IST

'राँग साईड'ने वाहतूक करणाऱ्या वाहनाधारकांवर पोलीस कारवाई करतात. मात्र, पोलीस विभागातील कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतानाही त्यांना मुभा देण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसांचा प्रताप : पेट्रोलपंपजवळील वळणावर कारवाईअमरावती : 'राँग साईड'ने वाहतूक करणाऱ्या वाहनाधारकांवर पोलीस कारवाई करतात. मात्र, पोलीस विभागातील कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतानाही त्यांना मुभा देण्यात येत आहे. हा प्रकार पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस पेट्रोलपंपकडे जाणाऱ्या वाहनचालकासोबत घडत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर प्रयत्नशील आहे. जनसामान्यांसाठी जो कायदा लागू आहे, तोच शासकीय कर्मचाऱ्यांनासुध्दा लागू होतो. मात्र, पोलीस पेट्रोलपंप म्हणून प्रख्यात असणाऱ्या पोलीस मुख्यालयाजवळील पेट्रोलपंप टी-पॉर्इंटवर असल्यामुळे अनेक वाहनधारक विरुध्द दिशेने वाहन घेऊन पेट्रोलपंपावर जात आहेत. हे नियमांचे उल्लंघन आहे, अशा वाहनाधारकांवर कारवाई करण्याचे कर्तव्य वाहतूक शाखा पार पाडत आहेत. मात्र, केवळ सामान्य नागरिकांच्या वाहनांनाच हा नियम लागू होतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यालयाकडून व बसस्थानकाकडून पेट्रोल भरण्याकरिता बहुतांश वाहने विरुध्द दिशेने जातात. त्या टी-पॉर्इंटवर दररोज पोलीस कर्मचारी तैनात असतात. मात्र, सामान्य नागरिक दिसताच वाहतूक पोलीस हात दाखवून थांबवतात. त्यांची चौकशी करून कागदपत्रे तपासण्यात येते. ते नसल्यास दंडात्मक कारवाईसुध्दा करण्यात येते. अनेकजण सोडण्यासाठी हात जोडून वाहन विनंती करतात. मात्र, तेथे कर्तव्यदक्ष राहून पोलीस कारवाई करताना आढळतात. एखादा पोलीस कर्मचारी राँग साईडने पेट्रोल भरण्याकरिता जात असला तरीही वाहतूक पोलीस त्यांना थांबवताना दिसले नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे नियम जनसामान्यांसाठीच आहे का, असा प्रश्न वाहनधारकांना भेडसावत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधण्याची गरज असल्याचे जनसामान्यांचे मत आहे.