शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: August 10, 2015 00:04 IST

राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गणेशोत्सव, ईद, नवरात्र, दिवाळी, राजकीय स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तींची ...

साप्ताहिक सुटीचा मोबदला : दैनिक भत्त्यात वाढसुरेश सवळे  चांदूरबाजारराज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गणेशोत्सव, ईद, नवरात्र, दिवाळी, राजकीय स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था, राज्यात विविध शहरांत भेट देणाऱ्या व्हीआयपी बंदोबस्तासह आदी कारणास्तव बंदोबस्ताकरिता कर्तव्याचा कालावधी हा बऱ्याचदा १२ तासांचा अथवा त्यापेक्षा जास्त काळ बंदोबस्तात घालवावा लागतो. अपुऱ्या मनुष्यबळामुळे राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या जातात. आता त्यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या भत्त्यामध्ये वाढ करणारा निर्णय शासनाच्या गृह विभागाने ६ आॅगस्ट रोजी एका आदेशान्वये घेतला आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, औद्योगिक भरभराट तसेच विविध धार्मिक उत्सव, सणासह आदी बऱ्याच सांस्कृतिक, राजकीय, विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम, महापुरूषांच्या जयंती, अनुचित घटना घडल्यास ठेवण्यात आलेला बंदोबस्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना या कामाकरिता कर्तव्य बजवावी लागतात. त्यामुळे १२ तास अथवा त्यापेक्षाही जास्त काळ पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त करावा लागतो. अनेक वेळा त्यांच्या सुट्या रद्द केल्या जातात. गृहविभागाच्या २० जुलै २००४ च्या आदेशान्वये पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात वेतनश्रेणीनुसार दैनिक भत्ता अल्प अल्प प्रमाणात दिला जातो. त्यामुळे कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याकरिता आता शासनाने त्यात सुधारणा करून दैनिक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात एका दिवसाचे वेतन (मूळ वेतन अधिक भत्ते) दैनिक भत्ता म्हणून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एका दिवसाचे वेतन दैनिक भत्ता म्हणून देण्यास साप्ताहिक सुटीची कमाल मर्यादा एका कॅलेंडर वर्षात ८ दिवस इतकी असेल.