पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपाईला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:19+5:302021-03-13T04:23:19+5:30

नांदगाव खंडेश्वर : चोरीच्या दाखल गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपायासह पोलीस पाटलाला रंगेहाथ अटक करण्यात ...

Police arrest soldier for accepting Rs 5,000 bribe | पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपाईला अटक

पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपाईला अटक

नांदगाव खंडेश्वर : चोरीच्या दाखल गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपायासह पोलीस पाटलाला रंगेहाथ अटक करण्यात आली. तालुक्यातील येणस येथे ९ मार्च रोजी एसीबीने ही कारवाई केली. पोलीस शिपाई प्रवीण ज्योतिदास तायडे (४५, नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत) व येवतीचा पोलीस पाटील केशव परशराम मेश्राम (४९) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांचे वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदारांचेसुद्धा नाव असल्याचे सांगून तक्रारदाराचे दाखल गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. सापळा कारवाई दरम्यान पोलीस शिपायाने पाच हजार रुपये लाच स्वीकारली. याप्ररणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

----------

Web Title: Police arrest soldier for accepting Rs 5,000 bribe