शंकर महाराज आश्रमाची सीआयडी चौकशी करा

By Admin | Updated: September 9, 2016 00:35 IST2016-09-09T00:35:18+5:302016-09-09T00:35:18+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील शाळेत नरबळीचा प्रयत्न करण्यात आला.

Please inquire about the CID of Shankar Maharaj Ashram | शंकर महाराज आश्रमाची सीआयडी चौकशी करा

शंकर महाराज आश्रमाची सीआयडी चौकशी करा

आर्वीत आक्रमक आंदोलन : लहुजी शक्ती सेनेची धडक
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील शाळेत नरबळीचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे शंकर महाराज आश्रम ट्रस्टीवर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करावी. सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने बुधवारी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
११ वर्षांचा प्रथमेश सगणे या मातंग समाजाच्या मुलाचा आश्रमातील कर्मचाऱ्यांनी गळा कापून अघोरी विद्या प्राप्त करण्याकरिता जीव घेण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणात शंकर महाराज व शाळेतील ट्रस्टींचा सहभाग होता. यापूर्वी अजय वणवे या मुलाचाही नरबळी देण्याचा प्रयत्न झाला होता.
या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून मुख्य सूत्रधारांना अटक करावी, अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक गणेश हलकारे यांनी पिंपळखुटा नरबळी प्रकरणाचा पंचनामा या विषयावर मार्गदर्शन केले.
आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष रूपेश खडसे विदर्भ कार्याध्यक्ष लहानुजी इंगळे, राजेश अहीव, दिलीप पोटफोडे, दशरत जाधव, दिलीप पोटफोडे, राजेश अहीव, सुधाकर लाडंगे, मंगेश लाडंगे, बबन गायकवाड, मंगेश प्रधान, संग्राम कळणे, पंकज जाधव, सुनील संतापे, गौरी वाघमारे, विनय इंगळे, अनिल पोटफोडे, अक्षय कांबळे, सतीश पिठे, किशोर बावणे आदी सहभागी झाले होते.
नरबळीचे दोन प्रयन्न उघड झाल्यानंतर राज्यात सर्वदुर या आश्रमातील सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी राण पेटले आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Please inquire about the CID of Shankar Maharaj Ashram