शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा जंगलात आढळले बिबट, हरिण

By admin | Updated: March 6, 2016 23:59 IST

पोहऱ्याच्या जंगलात पक्षी निरीक्षणादरम्यान निसर्गप्रेमींना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन घडले. सोबतच हरिण, नीलगाय आणि मोरदेखील मुक्त संचार करताना आढळून आले.

अमरावती : पोहऱ्याच्या जंगलात पक्षी निरीक्षणादरम्यान निसर्गप्रेमींना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन घडले. सोबतच हरिण, नीलगाय आणि मोरदेखील मुक्त संचार करताना आढळून आले. रविवारी सकाळी ६.३० वाजता पक्षिमित्र पोहऱ्याच्या जंगलात गेले असता त्यांना हा बिबट आहे. त्यावेळी बिबट्याचे दर्शन झाले. वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वर्तुळात पाच ते सहा बिबट असून ते जंगलातील विविध भागात फिरताना अनेकदा वनविभाग व जंगलाशेजारच्या गावकऱ्यांना आढळून आले आहेत. त्यातच पोहरा जंगलात स्थलांतर करून आलेला पट्टेदार वाघसुध्दा वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे जंगलात प्रवेश न करण्याचे आवाहन वनविभागाद्वारे वारंवार केले जाते. यावरून पोहऱ्याच्या जंगलात वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे सिध्द होते. पक्षी निरीक्षण व वन्यप्राणी अवलोकनाच्या उद्देशाने अनेक पक्षिमित्र जंगलातून जाणाऱ्या मार्गाने भ्रमण करतात. रविवारी सकाळी काही पक्षिमित्र पोहरा मार्गावरील वाघामाता मंदिर परिसरात जंगलात निरीक्षण करीत असताना ५०० मीटर अंतरावर त्यांना बिबट मुक्त संचार करताना आढळला. त्यांनी शांतपणे एकाच ठिकाणी बसून धाडसाने बिबट्याची छायाचित्रे ेकाढली. काही वेळात बिबट तेथून निघून गेला. थोड्याच वेळाने जंगलातील पाणवठ्यावर पाणी पिताना तहानलेला बिबटदेखील आढळून आला. या भ्रमंतीदरम्यान पक्षिमित्रांच्या कॅमेऱ्यात हरिण, मोर, काळवीट, निलगायदेखील कैद झाली आहेत. यापूर्वीसुध्दा पोहरा वनवर्तुळात बिबट्याचे पगमार्क आणि विष्ठा आढळून आल्याने या भागात बिबट असल्याची माहिती होती. ती आता खरी ठरली आहे. (प्रतिनिधी)