शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

पीआय भगत नियंत्रण कक्षात, पोलीस निलंबित

By admin | Updated: May 19, 2016 00:06 IST

पोलीस आयुक्तांच्या आदेशाने राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवा भगत यांना पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले असून ...

आयुक्तांचे आदेश : पोलीस विभागात खळबळअमरावती : पोलीस आयुक्तांच्या आदेशाने राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवा भगत यांना पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले असून अवघ्या एक दिवसापूर्वी स्थानांतरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवा भगत यांनी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यामुळे त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. अकोला एटीएसमध्ये पाच वर्षांपासून कार्यरत पोलीस कर्मचारी राजू खिलवाडे सोमवारी पोलीस आयुक्तालयात हजर झाले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त रजेवर असल्याने खिलवाडे प्रभारी पोलीस आयुक्त नितीन पवार यांच्या समक्ष उपस्थित झाले. पवार यांच्या आदेशाने खिलवाडेंचे गुन्हे शाखेत स्थानांतरण करण्यात आले. मंगळवारी खिलवाडे गुन्हे शाखेत रुजू झाले. मात्र, बुधवारी पोलीस आयुक्तांनी खिलवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. खिलवाडे अकोला येथे कार्यरत होते. त्यावेळी पोलीस उपायुक्त नितीन पवार हे सुध्दा अकोल्यात होते. त्यामुळे पवार व खिलवाडे यांचा परिचय होता. त्यांची विनंती बदली करण्यात आली होती. गुन्हे शाखेत चपळ पोलिसांना घेण्यात येते, खिलवाडे यांनी चुकीची माहिती देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)विनंती बदली अर्जावरून पीआय शिवा भगत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर खिलवाडे या पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून गुन्हेशाखेत बदली करून घेतली. त्यामुळे त्याला निलंबित केले आहे. - दत्तात्रेय मंडलिक,पोलीस आयुक्त