शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

फुलराणीने केली होती घरी परतण्याची विनंती

By admin | Updated: December 27, 2014 00:33 IST

घरी परतण्यासाठी अंबाने वसतिगृह अधीक्षकांकडे विनंती केली होती, असा उल्लेख असलेला तपोवन बालगृह अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा अहवाल 'लोकमत'च्या हाती लागला आहे.

गणेश देशमुख अमरावती
घरी परतण्यासाठी अंबाने वसतिगृह अधीक्षकांकडे विनंती केली होती, असा उल्लेख असलेला तपोवन बालगृह अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा अहवाल 'लोकमत'च्या हाती लागला आहे.
वसतिगृहातील वास्तव्यादरम्यान फसगत झाली असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर सुमारे महिनाभर तिने घरी जाण्यासाठी तगादा लावला; तथापि तिला घरी परतू दिले नाही. त्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात आला, असा आरोप अंबाच्या आई-वडिलांचा आहे. अटक आणि निलंबन झालेला तपोवनातील बालगृह अधीक्षक गजानन चुटे याने नागपूर बालकल्याण समितीला लिहिलेल्या पत्रात अंबा घरी जाण्यासाठी इच्छुक असल्याचा उल्लेख आहे. या पत्रात पुढच्या ओळीत तिने दुसरा अर्ज देऊन घरी जाण्याची विनंती रद्द केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
अंबा दहशतीत, व्हावी चौकशी!
आईवडिल असताना मुलगी बालगृहात वास्तव्यास आहे. घरी रहावयाचे नसल्याच्या तिच्याच म्हणण्यानुसारच आम्ही तिला बालगृहात प्रवेश दिला, असे संबंधितांकडून सांगितले जाते.
बालकल्याण समितीने घ्यावी दखल
अमरावती : अंबा एका षड्यंत्राची बळी आहे. ती फसलेली आहे. तिला घरी परतायचे आहे. आईला बिलगून एकदा ती ढसाढसा रडली होती. मला सोडवा, अशी विनंती तिने केली होती. वसतिगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद आहेत. तिच्या दोन मैत्रिणी भेटायला गेल्या त्यावेळीही तिने मला येथून काढा, अशी कळकळीची विनंती केली होती. त्या मुलींची नोंदही वसतिगृहातील रजिस्टरमध्ये आढळेल. ती पडताळावी. त्या मुलींचे बयाण घ्यावे. अंबा काय म्हणाली, याबाबत त्या बोलतील. आजीला फोन करून तिने भेटीला बोलविले होते. आवडीचे पदार्थ मागविले होते. मला घरी न्या, अशी विनंती केली होती. 'कॉल हिस्टरी'मध्ये तिने फोन केलेला क्रमांक सापडेल. अलीकडेच अंबाचा फोन आला. 'माझ्यावर काय बितते हे मी सांगू शकत नाही' असे वाक्य ती बोलली. 'तुम्ही लढा देत असल्यामुळे माझे आयुष्य धोक्यात आहे. तुम्हालाही धोका आहे. तुम्ही शांत रहा.' अशी विनवणी तिने केली होती, अशी माहिती अंबाच्या आईबाबांनी दिली. त्यांनी या सर्व बाबीच्या वेळोवेळी लेखी तक्रारी, अर्ज, माहिती योग्य त्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
- तर ती का बोलली असती?
अंबाला घरी यायचे नसते तर ती हे सारे का बोलली असती? तिने फोन का केले असते? ती आईला बिलगून का रडली असती? असे सवाल उपस्थित करतानाच, तिचा वापर केला जात आहे. १८ वर्षांची होईपर्यंत तिला जणू नजरकैद ठेवायचे आहे. त्यानंतर बालगृहातून ती निघाली की तिला इतर गैरमार्गात गुंतवायचे आहे, असे तिचे आईवडील बेंबीच्या देठापासून सांगतात. तिच्यावर ललित अग्निहोत्रीचा दबाव असल्याने, तो तिला मारहाण करीत असल्याने, कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत असल्याने ती इच्छेविरुद्ध सर्व सहन करीत आहे, असा आक्रोश तिच्या जन्मदात्यांचा आहे.
अंबाच्या मातापित्यांचा जो पोटतिडकीचा दावा आहे, त्यापोटी काही पुरावेदेखील उपलब्ध आहेत. त्याची दखल घेऊन बाल कल्याण समितीने स्वतंत्र चौकशी केल्यास अंबाच्या घराबाहेर असण्यामागे काही अपरिहार्यता आहे का, याची खातरजमा केली जाऊ शकेल.