शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडा थडी येथे फडकविला उलटा तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

चांदूर बाजार : तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना प्रशासक व सचिवांच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकविण्यात ...

चांदूर बाजार : तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना प्रशासक व सचिवांच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकविण्यात आला. याप्रकरणी काही नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढाकार घेतला. मात्र, प्रशासकाला प्रकरण दाबण्यात यश आल्याचे बोलले जात आहे.

शासनाने भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याकरिता ध्वजसंहिता निश्चित केली आहे. त्यानुसार शासकीय कार्यालयावर ध्वजारोहण नियमानुसार होणे गरजेचे आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने आशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. असाच प्रकार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात घडला.

ग्रामपंचायतचे प्रशासक व विस्तार अधिकारी नारायण आमझरे यांनी ध्वजारोहण केले असता. चक्क राष्ट्रध्वज उलटा फडकल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रगीतसुद्धा झाले. ही बाब नंतर उपस्थितांच्या लक्षात येताच उलट फडकलेला तिरंगा खाली उतरवून पुनश्च फडकविण्यात आला. प्रशासकाच्या या गलथान कारभाराविरुद्ध गावातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढाकार घेतला होता. मात्र, प्रशासक व ग्रामसेवकांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितल्याने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसली तरी ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करताना उलटा तिरंगा फडकल्याचे छायाचित्र तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ध्वजारोहणावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, गणमान्य उपस्थित होते. याप्रकरणी विचारणा केली असता, ब्राह्मणवाडा थडीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी कोणतीही तक्रार झाली नसल्याचे सांगितले. मात्र, या प्रकाराबाबत पंचायत समिती प्रशासनात एकच तारांबळ उडाली होती. प्रशासक व सचिवांच्या हलगर्जीपणामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याप्रकरणी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतील की, पाठराखण याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.