शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्टा बाळगणाऱ्याला अटक

By admin | Updated: March 4, 2017 00:13 IST

कंबरेत देशी कट्टा लावून संशयित स्थितीत फिरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहाजवळ अटक केली.

तीन जिवंत काडतुसे जप्त : गुन्हे शाखेची कारवाईअमरावती : कंबरेत देशी कट्टा लावून संशयित स्थितीत फिरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहाजवळ अटक केली. अब्दुल कासीब अब्दुल मोबीन (२४,रा. धर्मकाटा परिसर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याजवळून तीन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विश्राम गृहासमोरील मार्गावर आरोपी संशयितरीत्या फिरत होता. या तरुणाजवळ देशी कट्टा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख यांच्या पथकाने विश्राम गृहासमोरील मार्गावर सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलिसांनी अब्दुल कासीबची झडती घेऊन त्याच्याजवळून देशी कट्ट्यांसह तीन जिवंत काडतूस जप्त केले. पोलिसांनी अब्दुलची कसून चौकशी केली असता त्याने तो देशी कट्टा ट्रान्सपोर्ट नगरातील एका सरदार ट्रक चालकाकडून १० हजारात विकत घेतल्याचे सांगितले. छंद म्हणून तो देशी कट्टा जवळ बाळगल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उद्देशाने आरोपी फिरत असल्याचा संशय पोलिसांना आला. (प्रतिनिधी)आरोपी गांजाचा शौकीनआरोपी अब्दुल कासीब हा अमंली पदार्थात मोडणाऱ्या गांजाचा शौकीन आहे. नियमितत गांजाची नशा करून तो गुन्हेगारीसाठी देशी कट्ट्याचा वापर करत असावा, असा संशय पोलिसांना आहे. टवाळखोरांचा अड्डाफे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्किट हाऊस मार्ग व चपराशीपुरा परिसरात काही ठिकाणी टवाळखोरांचे अड्डे बनले आहे. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत अनेक तरुणांची गर्दी असते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून यापैकी काही युवकांजवळ देशी कट्टे असल्याची दाट शक्यता आहे. अनेक युवक रिव्हॉल्वर समजून देशी कट्टा बाळगण्याचा छंद जोपासत असल्याची माहितीची चर्चा तरुणांमध्ये सुरु असते.