शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

विजयी रॅलीसाठी लागणार परवानगी

By admin | Updated: May 15, 2014 23:07 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी होणार असलेल्या नेमाणी गोडाऊनसह ठिकठिकाणी ५00 पोलीस ..

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी होणार असलेल्या नेमाणी गोडाऊनसह ठिकठिकाणी ५00 पोलीस कर्मचारी-अधिकार्‍यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होताच विजयी उमेदवाराकडून मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक काढण्यासाठी उमेदवारांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी नसल्यास मिरवणूक काढता येणार नसल्याचे मत गुरुवारी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी लोकमत शी बोलतांना व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी नेमाणी गोदाम येथे शुक्रवार (ता.१६) राजी पार पडणार आहे. मतमोजणीदरम्यान बडनेरा- अमरावती मार्ग काही अंतरापर्यत बंद ठेवण्यात आला आहे. तेथील वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली आहे. नेमाणी गोदामापासून १00 मीटर अंतरावर मोठय़ा प्रमाणात बॅरीगेट्स लावण्यात येणार आहे. या १00 मीटरच्या आत वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १00 मीटर बाहेर स्वतंत्र वाहनतळ तयार करण्यात आले आहे. मतमोजणीदरम्यान सीआरपीएफचे सशस्त्र जवान नेमाणी गोदामात तैनात राहणार आहे.

शहरातील संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान नागरिकांनी शहरात शांतता ठेवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी केले आहे. (प्रतिनिधी)