शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचलित ५० पैशांच्या निकषाप्रमाणे होणार पैसेवारी जाहीर

By admin | Updated: September 27, 2015 00:03 IST

खरीप पिकांची ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारीचे जाहीर करण्याबाबतच्या सूचना शासनाने मागे घेतल्या आहेत

शासन निर्देश : ६७ पैशांपेक्षा कमी-जास्त पैसेवारीचे निकष मागेलोकमत विशेषअमरावती : खरीप पिकांची ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारीचे जाहीर करण्याबाबतच्या सूचना शासनाने मागे घेतल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ५० पैशांपेक्षा कमी किंवा अधिक प्रचलित नियमाने खरीप पिकांसाठी जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.दरवर्षी खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर केली जाते. यावर्षी मात्र १९ सप्टेंबरला खरीप पिकाची पैसेवारी शासनाने १६ सप्टेंबरला पत्रानुसार ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त याप्रमाणात जिल्ह्यात ५९ पैसे काढण्यात आली होती. या निकषानुसार जिल्ह्यातील १ हजार ९८१ या महसुली गावांची ही नजर अंदाज पैसेवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जाहीर केली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी शासनाने ६७ पैशांपेक्षा जास्त व कमी उत्पन्न हे आदेश मागे घेतले व पूर्वीप्रमाणेच ५० टक्क्यापेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पेैसेवारी जाहीर करण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यामुळे यापूर्वी १९ सप्टेंबरला जाहीर झालेली ५९ पैसेवारी ही आता जुन्याच ५० टक्क्यापेक्षा कमी किंवा जास्त या निकषाप्रमाणे होणार आहे. (प्रतिनिधी)अशी काढणार पुन्हा नजर अंदाज पैसेवारी५० पैशापेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारी काढण्यासाठी पुन्हा एकदा महसूल अधिकाऱ्यांना रँडम पध्दतीने फ्लॅट निवडून, प्रमुख पिकाकरिता प्रत्येक गावामध्ये किमान १२ भूखंड निवडून त्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याव्दारे खरीप पिकांच्या पैसेवारीचा अंदाज काढला जातो.१९ सप्टेंबरची अंदाज पैसेवारीजिल्ह्यात १९ सप्टेंबरला १९८१ गावात ५९ पैसे ही नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार अमरावती तालुक्यात ६१ पैसे, भातकुली ६०, नांदगावत ५७, चांदूरररेल्वे ५४, धामगणाव ६१, तिवसा ६१, मोर्शी ६५, वरूड ५९, अचलपूर ५६, चांदूरबाजार ५७, दर्यापूर ६२, अंजनगाव ५८, धारणी ५४ व चिखलदरा तालुक्याची ५७ पैसेही नजरअंदाज पैसेवारी रद्द होऊन प्रचलीत ५० पैशांपेक्षा कमी किंवा जास्त अशी काढण्यात येणार आहे.