शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शैक्षणिक साहित्याकरिता मोजावे लागणार पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

अमरावती : बालभारतीने विद्यार्थ्यांकरिता ई-बालभारती ॲप उपलब्ध केले आहे. परंतु, या ॲपवरील साहित्य वाचनाकरिता विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागणार ...

अमरावती : बालभारतीने विद्यार्थ्यांकरिता ई-बालभारती ॲप उपलब्ध केले आहे. परंतु, या ॲपवरील साहित्य वाचनाकरिता विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागणार असल्याने पालकांत नाराजीचा सूर उमटला आहे. याकरिता ५० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले असून जीएसटी तसेच इतर शुल्कही आकारले जाणार आहेत. शिक्षणहक्क कायद्यानुसार राज्यात शिक्षण मोफत आहे. मात्र, अभ्यास साहित्याकरीता पैसे मोजावे लागतील तर मग मोफत शिक्षण हक्क कायदा उरला तरी कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. बालभारतीचे ई-साहित्यही मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालकांनी सुरू केली आहे.

कोरोनात अनेक पालकांचे रोजगार गेले. ग्रामीण भागातील नागरिक जेमतेम परिस्थितीतून वाट काढत आहेत. विद्यार्थ्यांना स्मार्टफोन घेऊन देण्याकरिता पालकांजवळ पैसे नसल्याने त्यांनी ऑफलाईन शिक्षण सुरू करावे, अशी मागणी होत आहे. अशा परिस्थितीत बालभारतीने सशुल्क ॲप सुरू करणे चूकच आहे, असे पालकांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थ्यांना ही सुविधा मोफत उपलब्ध करून द्यावी, बालभारतीने पालकांच्या समस्यांची दखल घ्यावी, अशी बालभारतीने मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांना ई-साहित्य उपलब्ध होण्याकरिता बालभारतीच्या वेबसाईटवर पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा ॲपवर व्हिडीओही उपलब्ध करून दिले आहेत. याहीपेक्षा विद्यार्थ्यांना अतिरिक्त अभ्यास करायचा असेल, तर ई-बालभारती विभागाकडून शैक्षणिक साहित्य निर्माण केले असून, या शैक्षणिक साहित्याकरिता पैशांची आकारणी केली जाणार आहे.

कोट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत गरीब,गरजु विद्यार्थी शिक्षकतात त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका व नगर परिषदेमधील विद्यार्थ्यांकरिता बालभारतीने मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, म.रा. प्राथमिक शिक्षक समिती