शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो सावधान ! युवतींना प्रेमजाळ्यात फसविणारी टोळी सक्रिय

By admin | Updated: March 4, 2015 00:35 IST

प्रेम करणे गुन्हा नाही, परंतु प्रेम म्हणजे नेमके काय? प्रेमाची व्याख्याच बदलून गेली आहे.

संजय खासबागे ल्ल वरुडप्रेम करणे गुन्हा नाही, परंतु प्रेम म्हणजे नेमके काय? प्रेमाची व्याख्याच बदलून गेली आहे. आजच्या युगात लज्जा वेशीवर टांगून सार्वजनिक ठिकाणी टवाळखोर युवक-युवतींना प्रेमजाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याकडे पालकांचे पाल्यावर नसल्यामुळे मुलामुलींच्या वागणुकीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. या गंभीर सामाजिक समस्येचा वेध घेण्यासाठी शहरातील मंदिरे, तीर्थक्षेत्र, उद्यानांना भेटी दिल्या असता काहीसा विचित्र दिसून आला. असंख्य युवक-युवती नको त्या अवस्थेत दिसत होती. त्यांना कुणाचेही भय नसल्याचे दिसून आले. तारूण्यात पदार्पन करणारी ही शाळकरी मुले गणवेशातच शाळेतून बाहेर पडली होती. त्यांनी थेट नागठाणा, शेकदरी, सालबर्डी , अप्परवर्धा प्रकल्पासारखे निर्जन स्थळ शोधले होते. एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेऊन एकमेकांशी अश्लील चाळे सुरु केले होते. अंगात शाळेचा गणवेश, दफ्तर त्यांच्या पाठीवर असते. आईबाबांना शाळेत जाण्याचे कारण सांगूून स्वैराचाराने वागणारी ही युवा पीढी आज भरकटल्याचे दिसून आले. याचा शोध कुण्याही पालकाने घेतला नाही. अगदी कमी वयातील किशोरवयीन मिशीची साधी कोर नसलेली ही मुले. प्रेमाच्या नावाखाली स्वैैैराचाराचा आनंद लुटत होते.लोकं काय म्हणतील याची तमा नव्हती. मुलांच्या भरकटलेल्या पाऊलवाटा आयुष्याचे वाटोळे करु शकतातग्रामीण मुलींना प्रलोभन देऊन फसविणारी टोळी शहरात शिक्षणासाठी ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थिनी येतात. परंतु भामटे, टवाळखोर मुले त्या मुलींना हेरतात. त्यांना मोबाईलसह आकर्षित करणाऱ्या वस्तूचे प्रलोभन देऊन भावनाप्रधान होऊन ‘मी तुझाच आहे , तुझ्याशिवाय माझे कुणीच नाही ’ ‘साथ जियेंगे , साथ मरेंगे ’ वाटेल त्या प्रेमळ शब्दाचा वापर करुन अलगदच तरुणींना आपल्या प्रेमजाळयात अडकवितात. दिवसागणिक वाढणारे दिखावू प्रेमापुढे भरपूर काही करुन जाते. यातच मोबाईलवर अश्लील फोटो, चित्रफीत काढून पुढे तिचे लैंगिक शोषण केले जाते.पोलीस प्रशासनही हतबल !टवाळखोर युवकांना धडा शिकविण्यासाठी पोलीस सक्रिय असतात. परंतु कारवाईच्या वेळी पालक समोर येत नाही. बदनामीच्या भीतीपोटी म्हणून तक्रार दिल्या जात नाही. यामुळे पालकांच्या अनावस्थेमुळे पोलीससुध्दा कारवाई करुन शकत नसल्याने हतबल झाले. यामुळे पालकांनी जागृत होऊन पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.