सद्यस्थितीत मसानगंजमध्ये सर्वाधिक ३७ कोरोना संक्रमित आहेत. ताजनगर १५, हबीबनगर १४, फे्रजरपुरा १६, रतनगंज १५ संक्रमितांसह कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. या सर्व कंटेनमेंटमध्ये आरोग्य पथकांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अधिक कार्यक्षम होण्यासाठी ...
पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत जलसंपदा विभागाने घेतलेल्या २ जूनपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी ४०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...
दरवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आला की त्यांची इतकी चर्चा होते की, थेट मंत्रालयापर्यंत हा विषय पोहोचविला जातो. मंत्रालयातील मंत्री व सचिवांना देखील याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची वेळ दरवर्षी येत असते. शिक ...
फिनले मिलच्या मेंटेनन्सची कामे सुरू आहेत. २० ते २५ कर्मचारी याकरिता मिलमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश भोपाळ येथून एक अधिकारी शहरात दाखल झालेत. त्यांचे वास्तव्य देवमाळीत आहे. शहरात दाखल होताच ते फिनले मिलमध्ये पोहचलेत. परिसरात ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील लॅब ४ मे रोजी कार्यान्वित झाली. एम्स, नागपूर आणि आयसीएमआर, दिल्ली यांच्या निकषानुसार या लॅबचे कामकाज होत आहे. महिन्याभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्याच त्वरेने विद्यापीठाच्या लॅबमध्ये थ्रोट स्वॅब तपासणीचे ...
हमीभावाच्या शासन खरेदीत अटी अन् शर्ती भरणा आहे, तर खासगीत एकाही शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. बाजार समित्यांमध्ये हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांनी सर्वांनीच दिले आह ...
सततची नापिकी, बँकेचे कर्ज, खासगी सावकाराचे देणे तसेच पेरणीकरिता पैशाची तजवीज होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली. ...
अमरावती जिल्ह्यात दररोज नव्या भागात नोंद होत आहे. मंगळवारी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात चार महिने, दोन, पाच व दहा वर्षाच्या बालकांचाही समावेश आहे. दोन कुटुंबात आई-वडिलासह मुलगाही बाधित झाला आहे. ...