अवैध धंद्याचा केंद्रबिंदू ठरतोय सर्व्हे क्रमांक १२६!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:11+5:30

१२६ मधील गुजरी बाजाराने आपले अस्तित्व केव्हाचे हरविले आहे . बाजाराच्या ठिकाणी टिनाचे शेड आणि काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण धारकांनी गुजरी बाजाराला ग्रहण लावले आहे. हे ग्रहण हटविल्याशिवाय शहराचे विकास होणे अशक्य आहे. याकरिता नगरपंचायतीने अतिक्रमण मोहिम राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात राजकीय अडसर निर्माण करण्यात आला. अतिक्रमण मोहीम थांबविण्यात आली.

Survey No. 126 is becoming the focal point of illegal trade! | अवैध धंद्याचा केंद्रबिंदू ठरतोय सर्व्हे क्रमांक १२६!

अवैध धंद्याचा केंद्रबिंदू ठरतोय सर्व्हे क्रमांक १२६!

Next
ठळक मुद्देअतिक्रमणाचा विळखा : विकासात अडथळा

श्यामकांत पाण्डेय ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : आदिवासी बहुल मेळघाटातील आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या धारणी शहराला सध्या विकासाचे वेध लागले आहेत. मात्र शहराच्या विकासासाठी अतिक्रमण हा सर्वात मोठा अभिशाप ठरत आहे. तर येथील प्रसिद्ध सर्व्हे क्रमांक १२६ हा अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू ठरत आहे. नगरपंचायतीने विकासाच्या दृष्टिकोनातून अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रारंभ केली असली, तरी त्यात गुजरी बाजारातील राजकीय अतिक्रमण अडसर ठरत आहे.
इंग्रज काळापासून सर्व्हे नंबर १२६ हा गुजरी बाजार म्हणून ओळखला जातो. पूर्वी या बाजारात तंबू लावून दुकाने लावली जात असे. मात्र १५/२० वर्षांपासून ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य आणि सध्याचे नगरपंचायतीचे काही नगरसेवकांनी हित साधण्यासाठी हा सर्व्हे क्रमांक प्रशासकीय लालफितशाहीत अडकविल्याचा आरोप आहे.
१२६ मधील गुजरी बाजाराने आपले अस्तित्व केव्हाचे हरविले आहे . बाजाराच्या ठिकाणी टिनाचे शेड आणि काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण धारकांनी गुजरी बाजाराला ग्रहण लावले आहे. हे ग्रहण हटविल्याशिवाय शहराचे विकास होणे अशक्य आहे. याकरिता नगरपंचायतीने अतिक्रमण मोहिम राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात राजकीय अडसर निर्माण करण्यात आला. अतिक्रमण मोहीम थांबविण्यात आली. शहराच्या विकासासाठी अडसर ठरणारे अतिक्रमण काढण्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायतीची असताना व ते काढीत असताना राजकारण्यांनी त्यात नाक खुपसू नये, अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. १२६ हा सर्व्हे क्रमांक, तू जागा शहराचे हृदयस्थळ आहे. यात झालेले अतिक्रमण संपवून दुकानांची निर्मिती केल्यास शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून एक नवीन विकासाचा अध्याय सुरू होणार होता. मात्र, राजकीय दबावापोटी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण मोहीम तीन महिने पुढे ढकलली. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यात राजकीय लोकांनी अडथळा निर्माण करू नये, अशी अपेक्षा आहे.

नगरपंचायतमार्फत सर्व्हे क्रमांक १२६ मध्ये ओटे निर्मितीची निविदा काढण्यात आली. त्यानुसार शंभर ओटे बांधून अतिक्रमणधारकांना देण्याचा नगरपंचायतीचा मानस आहे. मात्र काही अतिक्रमण धारकांनी राजकीय दबावाचा वापर करून अडथळा निर्माण केला. - शैलेंद्र जांबेकर
नगराध्यक्ष, नगरपंचायत, धारणी .
 

Web Title: Survey No. 126 is becoming the focal point of illegal trade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.