23 positive in Amravati; 429 corona free, total 640 | अमरावतीत २३ पॉझिटिव्ह; ४२९ कोरोनामुक्त,  एकूण ६४०

अमरावतीत २३ पॉझिटिव्ह; ४२९ कोरोनामुक्त,  एकूण ६४०

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे.  शुक्रवारी तब्बल २३ पॉझिटिव्ह आढळल्याने आतापर्यंत ६४० संक्रमितांची नोंद झाली आहे. 

अमरावतीच्या सरस्वतीनगरातील १७ वर्षीय युवती, नवाथेनगर येथील ४३ वर्षीय महिला, आदर्श नेहरूनगर येथील ४९ वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील ४० वर्षीय महिला, २९ वर्षीय पुरुष, ४५ व २५ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय महिला, बडनेरा जुनीवस्ती माळीपुरा येथील ६० वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष, स्थानिक दस्तुरनगर मधुबन लेआऊट परिसरातील ५८ व ३८ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष, चांदनी चौकातील ५० वर्षीय महिला, धारणी येथील ३० वर्षीय पुरूष, महाजनपुरा येथील ४० वर्षीय महिला, नांदगाव पेठ येथील २२ वर्षीय महिला, जेल रोडवरील क्वारंटाईन कक्ष ५५ वर्षीय महिला, आशियाड कॉलनी ५७ वर्षीय पुरुष, भीमनगर येथील ५२ वर्षीय पुरूष, गजानननगर ५४ वर्षीय महिला, हबीबनगर येथील ३२ वर्षीय पुरुष आणि नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयातील ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. 
४११ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यृ झाला आहे. १८६ रूग्ण उपचार घेत आहे. ४२९ कोरोना मुक्त झाले आहेत.

Web Title: 23 positive in Amravati; 429 corona free, total 640

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.