शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन रुग्णालयातील ऑक्सिजन लिक्विड टँक रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हची संख्या वाढतीच असल्याने उपलब्ध बेडची संख्या अपुरी पडण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कोरोनाबाधितांवर अत्यंत ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हची संख्या वाढतीच असल्याने उपलब्ध बेडची संख्या अपुरी पडण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कोरोनाबाधितांवर अत्यंत महत्त्वपूर्ण उपचार ठरणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकमधील लिक्विड चार दिवसांपासून संपला असताना अद्याप संबंधित कंत्राटदाराने त्याची पूर्तता केलेली नाही. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याने नियमित ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. वॉर्ड क्रमांक १० मध्ये सारी आजाराच्या रुग्णांवर उपचारार्थ १४ बेडची व्यवस्था असताना २५ रुग्णांवर उचार सुरू आहे. तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना सतत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. मात्र, चार दिवसांपासून टँकमधील लिक्विड संपला असताना संबंधित एजन्सीला कळविल्यानंतरही पुरवठा झालेला नाही. त्यामुळे केवळ सिलिंडरच्या आधारे गरजूंना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

बॉक्स

ऑक्सिजनअभावी ५५ वर्षीय व्यक्ती दगावले

महात्मा फुले बँकेत कार्यरत ५५ वर्षीय कर्मचारी चार महिन्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. उपचारादरम्यान त्यांची ऑक्सिजन लेवल कमी असल्याचे निदान झाले. उपचाराने ते बरे झाले. काही दिवस त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवला. त्यातून ते बरेही झाले. मात्र, पाच दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने येथील पीडीएमसीत भरती करण्यात आले. उपचार घेतलासुद्धा. परंतु त्यांची ऑक्सिजन लेवल सुधारली नाही. बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना भरती करण्याची धडपड नातेवाईकांनी चालवली. परंतु ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकले नाही. त्यातच गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

--

एजन्सीचा हलगर्जीपणा भोवतोय

जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन लिक्विड टँकद्वारा ३१ मार्च पासून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला गेला. ते लिक्विड संपल्यानंतर दोन वेळा लिक्विडचा भरणा करण्यात आला. तेसुद्धा संपले. यावरून ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आता सिलिंडर किती दिवस पुरणार, याचा विचार प्रशासनाने करायला नको का, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोट

ऑक्सिजनची सर्वाधिक आवश्यकता सुपर स्पेशालिटीत असल्याने तेथे मुबलक ऑक्सिजन उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीचे २५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्याकरिता १४० सिलिंडर उपलब्ध आहेत. गरजेनुसार बोलावले जातील.

- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक