शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र झड, धरणे ओव्हरफ्लो, पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

ऑगस्ट महिन्यात आतापर्यत सरासरी १९०.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. या आठवड्यात एकूण झडसदृष्य स्थिती आहे. उर्ध्व वर्धा धरण क्षेत्रात २४ तासांत मुसळधार पाऊस झाल्याने व मध्यप्रदेशातूनही आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. येथे ४,२३८ क्युसेक्स मीटर प्रति सेंकद असा विसर्ग सुरु आहे. चंद्रभागा धरणाचे ३ गेट ५ सेंमीने उघडण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देझटामझिरीला युवक बुडाला : वरूड तालुक्यात अतिवृष्टी, दहा तालुक्यांत पावसाची सरासरी पार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २४ तासांपासून सार्वत्रिक पाऊस सुरू आहे. धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात २९.७ मिमी पावसाची नोंद झाली. वरुड तालुक्यातील वरुड, शेंदूरजना घाट, लोणी, वाठोडा व राजुरा या पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या तालुक्यात सरासरी ६५.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. झटामझिरी येथे एक युवक पावसात वाहून गेल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाने शनिवारी दिली.ऑगस्ट महिन्यात आतापर्यत सरासरी १९०.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. या आठवड्यात एकूण झडसदृष्य स्थिती आहे. उर्ध्व वर्धा धरण क्षेत्रात २४ तासांत मुसळधार पाऊस झाल्याने व मध्यप्रदेशातूनही आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. येथे ४,२३८ क्युसेक्स मीटर प्रति सेंकद असा विसर्ग सुरु आहे. चंद्रभागा धरणाचे ३ गेट ५ सेंमीने उघडण्यात आलेले आहे.वरुड तालुक्यात झटामझिरी येथील तलावामध्ये पोहायला गेलेला १९ वर्षीय युवक संजय कुसराम याचा तलावाच्या ओव्हरफ्लोमध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.जिल्ह्यातील धारणी तालुक्यात ५८७.६ मिमी, चिखलदरा ६२६.२, अमरावती ६४५.८, भातकुली ७०५.३, नांदगाव खंडेश्वर ७९३.७, चांदूर रेल्वे ५८७.२, तिवसा ५५९.७, मोर्शी ६८४.८, वरुड ७७७.५, दर्यापूर ७०७.१, अंजनगाव सुर्जी ५८४.४, अचलपूर ५३८, चांदूर बाजार ७१६.२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५९५.४ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.प्रकल्प लबालबअप्पर वर्धा प्रकल्पाची १३ दारे उघडण्यात आली. या प्रकल्पात ९७.५५ टक्के जलसाठा झाला आहे. शहानूरमध्ये ९०.७९, चंद्रभागा प्रकल्पात ९२.५१, पुर्णा प्रकल्पामध्ये ८४.९०, सपन प्रकल्पात ८१.०१ टक्के जलसाठा झाला आहे. तर पंढरी मध्यम प्रकल्प १३.६९ टक्कयांवर स्थिरावला आहे.कौंडण्यपूरच्या पुलावरून पाणीतिवसा : अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे २ मीटरने उघडण्यात आल्याने वर्धा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. तिवसा तालुक्यात पावसाचा कहर पहायला मिळाला. नमस्कारी गावाला चारही बाजूने पुराने वेढा घातला आहे. या गावचा तालुक्याशी संपर्क तुटला तर वरखेड येथे एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले. कौंडण्यपूर येथील पुलावरून पाणी गेल्याने अमरावती व वर्धा जिल्हयाचा संपर्क तुटला आहे.दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यात उर्ध्व वर्धा धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि वर्धा नदीला आलेला पूर यामुळे लहान नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. नमस्कारी गाव हे नदी काठावर असल्याने येथील नाल्यालाही पूर आला. चारही बाजूंनी पाणी असल्याने पुराने गावाला वेढा घातला आहे. कौंडण्यपूर येथील पुलावरून शनिवार सकाळपासून पाणी जात आहे. त्यामुळे हा राज्य महामार्ग बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे वरखेड येथील प्रल्हाद भोंडे यांच्या राहत्या घराची भिंत पडली. तहसीलदार वैभव फरतारे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. मंडळ अधिकारी नंदू मधापुरे हे पूरस्थळी भेटी देत आहेत.बेंबळाला पूर, पहूर-नांदगाव मार्ग बंदनांदगाव खंडेश्वर : शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे बेंबळा नदीला पूर आला आहे. पहूर ते नांदगाव खंडेश्वर मार्गावरील पुलावरून तीन फुटांच्यावर पाणी वाहत होते. त्यामुळे हा मार्ग सकाळी ६ ते १० पर्यंत चार तास बंद पडला होता.नदीकाठच्या खोलगट शेतजमिनीत पुराचे पाणी शिरले. सततच्या पावसामुळे पाणी साठवून राहणाऱ्या जमिनीतील कपाशीचे पीक पीवळे पडले आहे. सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे, पातेगळ झाली. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीतील कपाशीच्या पिकाची पाणी पिवळे होऊन गळली असल्याचे शेतकरी पद्माकर भेंडे यांनी सांगितले.तालुक्यातील सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. नुकसानीने सर्वेक्षण करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.तालुक्यात शनिवार सकाळपर्यंत नांदगाव खंडेश्वर महसूल मंडळात ४१ मिमी पावसाची नोंद झाली. धानोरा गुरव ४२, दाभा ३८, माहुली चोर ४३, लोणी टाकळी ३५, पापळ ५५, मंगरूळ चव्हाळा ३०, शिवनी रसुलापुर महसूल मंडळात ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस